जडेजाने शेअर केला शिवसेनाप्रमुखांचा व्हिडीओ; गुजराती लोकांनो अजुनही वेळ आहे

माझे हेच म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजुला केले तर तुमचे गुजरात गेले. हेच मी अडवानींजवळ बोललेलो आहे, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत भाजपला मतदान करण्याचे आवाहन वेगळ्या पद्धतीने जडेजाने केले आहे. जडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत. रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

    अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election) आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. त्यातच क्रिकेटर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. गुजराती लोकांनो (Gujarati People) अजुनही वेळ आहे, समजून घ्या, असे कॅप्शन जडेजाने या व्हिडीओला दिले आहे. या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) भाष्य करताना दिसत आहेत.

    माझे हेच म्हणणे आहे की, नरेंद्र मोदी गेले, तर गुजरातही जाईल. जर नरेंद्र मोदींना तुम्ही बाजुला केले तर तुमचे गुजरात गेले. हेच मी अडवानींजवळ बोललेलो आहे, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत भाजपला मतदान करण्याचे आवाहन वेगळ्या पद्धतीने जडेजाने केले आहे. जडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. रिवाबा यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

    एकाच जागेसाठी जडेजाची बहीण तथा काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख नैनाबा जडेजा यांनी काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार केला. या जागेसाठी रवींद्र जडेजाच्या घरातील दोन महिला आमने-सामने आल्याने राजकीय चुरस निर्माण झाली.