मोरबी पूल दुर्घटना; बुडणाऱ्यांना वाचवणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी मतदार

कांतिलाल यांनी काँग्रेसच्या जयंती पटेल यांचा पराभव केला आहे. २०१७ मध्ये मोरबी मतदारसंघामध्ये काँग्रेसची सत्ता होती. याच मतदारसंघामधून आम आदमी पार्टीचे उमेदवार पंकज रनसरिया यांना चार हजार ३०० मते मिळाली आहेत. आतापर्यंत १० वेळा या मतदारसंघामध्ये भाजपाने विजय मिळवला आहे.

    अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) तोंडावरच मोरबी पूल दुर्घटनेवरून (Morbi Pool Accident) भाजपवर देशभरातून चर्चा झाली. या मतदारसंघातून भाजपने (BJP) कांतिलाल शिवलाल अमृतिया (Kantilal Amrutia) यांना तिकीट दिले. मोरबी दुर्घटनेवेळी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावलेल्या कांतिलाल यांनी अनेकांचे प्राण वाचवले. या मदतीमुळे कांतिलाल हे संपूर्ण देशभरामध्ये चर्चेत होते. या निवडणुकीत मतदारांनी त्यांना कौल दिला आहे.

    कांतिलाल यांनी काँग्रेसच्या जयंती पटेल (Jayanti Patel) यांचा पराभव केला आहे. २०१७ मध्ये मोरबी मतदारसंघामध्ये काँग्रेसची सत्ता होती. याच मतदारसंघामधून आम आदमी पार्टीचे उमेदवार पंकज रनसरिया यांना चार हजार ३०० मते मिळाली आहेत. आतापर्यंत १० वेळा या मतदारसंघामध्ये भाजपाने विजय मिळवला आहे.

    २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते ब्रिजेश मेरजा हे या मतदारसंघामधून जिंकले होते. सन १९८० ते २०२० दरम्यान झालेल्या १० निवडणुका आणि पोटनिवडणुकांपैकी सात निवडणुकींमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने १९८० आणि २०१७ मध्ये या ठिकाणी विजय मिळवला होता. यंदा आम आदमी पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात आहे.