Digestion Problem

भारतीयांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या ५६% भारतीय कुटुंबांमध्ये पचनाच्या आरोग्याविषयीच्या समस्या(Digestion Problem) असल्याचे आशीर्वाद आटा वुइथ मल्टिग्रेन्सतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.जागतिक पाचक आरोग्य दिन २०२१ च्या औचित्याने mompresso.com यांनी केलेल्या सर्वेक्षणात भारतीय मातांकडून या संदर्भातील बारकावे जाणून घेण्यात आले.

    मुंबई: आशीर्वाद (aashriwad)ब्रँडकडून २९ मे २०२१ रोजी असलेल्या जागतिक पाचक आरोग्य दिनाच्या(World Digestive Helath Day) निमित्ताने भारतीय कुटुबांच्या पाचक आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले. मातांसाठी असलेल्या मॉम्सप्रेसो या भारतातील आघाडीच्या प्लॅटफॉर्मने ब्रँडसाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथील एकूण ५३८ मातांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात व्यावसायिक, उद्योजिका, कर्मचारी आणि गृहिणी अशा सर्वांचा समावेश होता.

    या सर्वेक्षणातून ग्राहकांची जीवनशैली आणि त्यांच्या खानपानाच्या सवयी दिसून आल्या. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार ७७% भारतीय माता पाचक आरोग्याला अत्यंत महत्त्व देतात तर ५६% मातांना वाटते की त्यांच्या कुटुंबियांना पाचक आरोग्याच्या समस्या आहेत. या अभ्यासात असे दिसून आले की, ५०% भारतीय कुटुंबांमध्ये २-३ पाचक आरोग्य समस्यांची तक्रार असते. गॅस, पित्त आणि अपचन या तीन समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या सर्वेक्षणातील ५०% व्यक्तींनी यापैकी किमान एका समस्येचा त्रास असल्याचे सांगितले.

    सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५०% हून अधिक व्यक्तींना असे वाटते की, वजन व्यवस्थापन, ऊर्जा पातळी यावर पाचक आरोग्याचा परिणाम होतो. परिणामी, शौचाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. ४०% व्यक्तींना वाटते की त्यांचे कुटुंबिय आणि त्यांचे स्वतःचे पोटाचे आरोग्य चांगले नाही. या समस्यांचा सर्वाधिक त्रास अनुक्रमे पती, सासू-सासरे/आई-वडील आणि स्वतःला होत असल्याचे मानतात. पोटाच्या आरोग्यासाठी जीवनशैली आणि आहाराच्या सवयी कारणीभूत असतात. झोपेची अनियमित वेळ, मसालेदार, तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे, पाणी कमी पिणे आणि दर आठवड्याला सरासरी १.५ वेळा शारीरिक व्यायाम करणे हा जीवनशैलीचा सर्वसमान्यपणे आढळून येणारा पॅटर्न आहे. पचनाशी संबंधित समस्यांसाठी घरगुती उपाय आणि खानपानाच्या सवयींमध्ये बदल हे उपाय ७०% व्यक्ती करतात.

    आहारामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच गव्हाची उत्पादने, तृणधान्ये, फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश केल्याने पचनाला मदत होते आणि शौचाशी संबंधित समस्यांपासूनही दिलासा मिळतो, ऊर्जा मिळते आणि पोट भरल्याचे समाधानही मिळते. परिणामी, वजन व्यवस्थापन करणे सुलभ जाते.

    या उपक्रमाबद्दल आयटीसी लि.च्या फुड्स डिव्हिजच्या स्टेपल्स, स्नॅक्स अँड मील्सचे एसबीयू चीफ एक्झिक्युटिव्ह गणेश कुमार सुंदरारमन म्हणाले, पचनाशी संबंधित समस्यांमुळे जीवनमानाच्या दर्जावर परिणाम होतो. पण खानपानाच्या सवयींमध्ये बदल करून त्यांचे व्यवस्थापन करता येऊ शकते. पाचक आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक पाचक आरोग्य दिन हे उचित निमित्त आहे.