हार्ट अटॅकची भीती आहे? मग प्या विड्याच्या पानांचा काढा; जाणून घ्या विधी

हार्ट अटॅकला (Heart attack) दूर ठेवण्यासाठी एक घरगुती उपाय आहे. सर्वसामान्यपणे सहज उपलब्ध होणाऱ्या विड्याच्या पानाचा काढा तुम्हाला हार्ट अटॅकपासून (Heart attack) वाचवू शकतो. 

  बिग बॉस (big boss) फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याला अवघ्या चाळीशीत हार्ट अटॅक (Heart attack) आला आणि भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरली. आधी सत्तरीत येणारा हार्ट अटॅक (Heart attack) आता तिशी आणि चाळीशीत येऊ लागल्याने चिंता वाढली आहे.

  हार्ट अटॅकला (Heart attack) दूर ठेवण्यासाठी एक घरगुती उपाय आहे. सर्वसामान्यपणे सहज उपलब्ध होणाऱ्या विड्याच्या पानाचा काढा तुम्हाला हार्ट अटॅकपासून (Heart attack) वाचवू शकतो.

  असा तयार करा विड्याच्या पानांचा काढा:

  हा काढा तयार करणे खूपच सोपे आहे. एक ग्लास स्वच्छ पिण्याच्या पाण्यात आपल्या प्रकृतीनुसार विडयाची पाने उकळण्यासाठी टाका. पाणी अर्धा ग्लास होई पर्यंत पानांसह आटवावे/शिजवावे. पाणी व्यवस्थित शिजले की आचेवरुन काढा आणि हे पाणी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी प्या. विडयाचे पानांच्या काढ्याचे सेवन करण्याचा हा योग्य मार्ग आहे. आपण जर असेच नित्यनियमाने काढ्याचे सेवन केले तर नखशिखान्त शरीराची प्रत्येक रोगव्याधी मुळापासून दूर होऊन शरीर निरोगी व तंदुरुस्त होईल.

  विड्याच्या पानांच्या काढ्याचे फायदे:

  मधुमेह : मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांनी विडयाच्या पानांचा काढा घेतल्याने. रक्तातील साखर नियंत्रणात येते.

  कोलेस्टेरॉल नियंत्रण : विडयाचे पान हे कोलेस्ट्रॉल तर नियंत्रित करुन हृदयरोगांसही प्रतिबंध करते. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढविते, जेणेकरून नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत व हृदयविकाराच्या धोकाही टळतो.

  पोटाचे आजार : विडयाच्या पानांतील फायबर आणि इतर पोषक घटक पोटाच्या आजारांना बरे करण्यास साह्यभूत ठरतात. पचन शक्ति मजबूत होऊन आपण पोटदुखी, वायू, अपचन, बद्धकोष्ठता आणि आंबटपणा सारख्या व्याधींपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

  लठ्ठपणा/स्थूलता नियंत्रण : विड्याच्या पानांमुळे स्थूलता/लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. चयापचय व पाचनप्रणाली मजबूत होते. शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळून अतिरिक्त चरबी वितळण्यास सुरवात होते.