वयाच्या चाळिशीनंतर पुरुषांनी ‘या’ टेस्ट नक्की कराव्या; जाणून घ्या माहिती

वयाच्या चाळिशीपर्यंत पुरुष कुटुंब आणि करिअर यामध्ये बस्तान बसविण्यात इतके व्यग्र असतात की अनेक आजार केव्हा विळखा घालतात हे कळत देखील नाही.

  वयाच्या चाळिशीपर्यंत पुरुष कुटुंब आणि करिअर यामध्ये बस्तान बसविण्यात इतके व्यग्र असतात की अनेक आजार केव्हा विळखा घालतात हे कळत देखील नाही. यासाठी योग्यवेळेत उपचार घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत.

  मधुमेह
  मधुमेहामुळे तुम्ही अनेक समस्यांना बळी पडू शकता. डॉक्टरांच्या माहितीनुसार मधुमेहग्रस्त एक चतुर्थांश लोक लवकर उपचार घेत नाहीत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये सांगितल्याप्रमाणे, रोज 30 मिनिट व्यायाम आणि 5 टक्के वजन कमी केल्याने मधुमेहाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

  एचआयव्ही
  विविध संशोधनातून सिद्ध झाले की, एचआयव्हीची लागण झालेल्या 33 टक्के लोकांना हा आजार झाल्याचे माहीत नसते. म्हणून याची तपासणी करून घ्यावी. ही एक सामान्य रक्त तपासणी असते. या व्यतिरिक्त डॉक्टरचा सल्ला घेत इतर चाचण्यादेखील करून घ्याव्यात. पुरुषांनी दर पाच वर्षांनी तपासणी करणे आवश्यक आहे.

  कोलेस्टेरॉल
  शरीरात साठलेला बॅड कोलेस्टेरॉल हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचे कारण मानले जाते. जर तुम्हाला हृदयसंबंधी समस्या असेल आणि उच्च रक्तदाब कमी किंवा जास्त असेल तर कोलेस्टेरॉल चाचणी करणे आवश्यक आहे. याची पहिली तपासणी वयाच्या 20 वर्षी करावी.

  टेस्टिकुलर कॅन्सर
  कर्करोग संशोधकांच्या मते, 20 ते 39 वयोगटातील पुरुषामध्ये सर्वात सामान्य रोग म्हणजे अंडकोष कर्करोग आहे. जर हा आजार वेळेतच ओळखला गेला तर सहजच बरा होतो. ही गाठ खूप लहान असते. यासाठी आपल्याला अंडकोष तपासणी करावी लागते. पुरुषांनी वर्षातून दोन किंवा तीन वेळा ही तपासणी केली पाहिजे.

  बीएमआय
  लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. बीएमआयमध्ये उंचीनुसार योग्य वजन निश्चित केले जाते आणि ही चाचणी केल्यानंतर वजन समजते. 18.5 ते 24.9 च्यामधील बीएमआय योग्य मानला जातो. जर बीएमआय यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वजन कमी करणे आवश्यक आहे.