डोकेदुखीच्या त्रासाने हैरान आहात?; मग करा हे सोपे आणि घरगुती उपाय

डोकेदुखी ही सामान्य समस्या आहे. अनेकांना हा त्रास वारंवार होत असतो. प्रत्येकवेळेस औषध घेणे नसते.

  डोकेदुखी ही सामान्य समस्या आहे. अनेकांना हा त्रास वारंवार होत असतो. प्रत्येकवेळेस औषध घेणे नसते. त्यामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळेस काही सोप्या घरगुती उपायांनी डोकेदुखीवर मत करता येणे शक्य आहे.

  दालचिनी:- डोकेदुखी होत असल्यास थोड्या पाण्यामध्ये दालचिनी बारीक करून त्याची पेस्ट कपाळावर लावावी. जेव्हा ती पेस्ट कोरडी होते तेव्हा ती थंड पाण्याने धुवून घ्यावी. यामुळे कपाळातील उष्णता दूर होते आणि डोकेदुखीपासून आपल्याला आराम मिळतो.

  मसाला चहा:- आपण बर्‍याचदा डोकेदुखीचा त्रास असताना चहा पितो. यामुळे बर्‍याच प्रमाणात आराम देखील मिळतो, परंतु डोकेदुखी तेव्हाच कमी होते जेव्हा आपला चहा मसालेदार असतो. याचा अर्थ असा नाही की केवळ चहा पावडर आणि साखर असलेला चहा डोकेदुखीपासून आपल्याला आराम देतो. जर आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळवायचा असेल तर चहामध्ये तुळस, मिरपूड आणि लवंगा घालाव्यात आणि त्याचा एकदम कडक मसालेदार चहा बनवावा. यामुळे डोकेदुखी पासून आपल्याला त्वरित आराम मिळतो.

  लेप:- पीपल, कोरडे आले आणि बडीशेप या सर्व वस्तू प्रथम बारीक करून घ्याव्यात. यानंतर या पावडर थोडे पाणी घालून त्याची पेस्ट बनवावी. आणि ही पेस्ट कपाळावर लावावी. यामुळे डोकेदुखी आपल्याला त्वरित आराम मिळतो.

  मसाज:-  बर्‍याच वेळा डोकेदुखी अत्यधिक तणाव आणि जास्त थकव्यामुळे सुद्धा उद्भवते. अशा परिस्थितीत आपले मन फक्त आराम करण्याची इच्छा बाळगते. पण यातून आपण मार्ग काढू शकतो. आपण आपल्या डोक्यावर मसाज करून त्वरित आराम मिळवू शकतो. यासाठी कोमट तेल घेऊन टाळूवर त्या तेलाने मालिश करावी. हा एक आयुर्वेदिक उपचार करून आपण डोकेदुखी पासून आपली सुटका करून घेऊ शकतो.

  योग- डोकेदुखी दूर करण्यासाठी योगा एक उत्तम पर्याय आहे. प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फा-यदे होतात. वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य हे सर्व योगामुळे साध्य होऊ शकते.