कोरोनानंतर होणाऱ्या बुरशीजंन्य आजारांत वाढ, पुण्यात आढळले चार रुग्ण

वैद्यकीय भाषेनुसार ज्याला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस म्हटलं जातं, हा एक प्रकारे पाठीच्या मणक्याच्या क्षयरोगाचा प्रकार आहे. या प्रकारचा क्षयरोग हा कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडाच्या पोकळीमध्ये आढळतो. तर दुर्मिळ प्रकरणात काही वेळा तो फुप्फुसामध्ये आढळून येतो.

    देशातील कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड संक्रमितांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. ही आनंदाची बाब असली तरी पोस्ट कोविड आजारांचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बरे झालेल्यांमध्ये म्युकरमायकोसिस सारखा आजार आढळून आला. त्यातूनही आपण बाहेर पडत असतान पाठिमागील काही महिन्यांपासून एक नवीनच आजार कोविड संसर्गातून बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये दिसत आहे. हा एक प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे. पुणे शहरात या आजाराचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे.

    पुण्यातील प्रभाकर (वय – ६६) यांना करोनातून बरे झाल्यानंतर एका महिन्याने सौम्य ताप, पाठ आणि कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी सुरुवातीला त्यांच्यावर पाठ आणि कंबरेचे स्नायू शिथिल करणाऱ्या आणि नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधांनी उपचार केले. त्यानंतर त्यांचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्यामध्ये स्पॉन्डिलोडायसिटिस नावाच्या स्पाइनल-डिस्क स्पेसमध्ये गंभीर संक्रमणामुळे हाडांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यांच्या हाडांमध्ये एक प्रकारशी बुरशी आढळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

    वैद्यकीय भाषेनुसार ज्याला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस म्हटलं जातं, हा एक प्रकारे पाठीच्या मणक्याच्या क्षयरोगाचा प्रकार आहे. या प्रकारचा क्षयरोग हा कोरोना संक्रमणातून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडाच्या पोकळीमध्ये आढळतो. तर दुर्मिळ प्रकरणात काही वेळा तो फुप्फुसामध्ये आढळून येतो.

    या चार रुग्णांमध्ये एक गोष्ट समान होती. ती म्हणजे सर्वांना गंभीर स्वरुपाचा करोना झाला होता आणि  करोना तसेच निमोनियासंबंधीत उपचार करण्यासाठी त्यांच्यावर स्टेरॉईडचे उपचार केले गेले. “कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा जास्त काळ वापर करून एखाद्या रोगाचा उपचार केला जातो. परंतु त्यासोबत इतर कोणती औषधे वापरली जातात हे देखील महत्वाचं आहे. अन्यथा त्यामुळे काही संधीसाधू संसर्गाचा धोका वाढू शकतो. दरम्यान बुरशीजन्य आजार झालेल्या या चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत,” असे प्रयाग म्हणाले.