सतत इअर बर्ड वापरणाऱ्यांनो लगेच व्हा सावध!; जाणून घ्या धोके

इअरबर्ड हे प्लास्टिक किंवा लाकडाचे असते, ज्यावर कापूस गुंडाळलेला असतो. यावर कापूस गुंडाळला असल्याने आपल्याला कानात काही इजा होणार नाही किंवा याचा त्रास होणार नाही असे आपल्याला वाटत जरी असले, तरी असे करणे देखील धोक्याचे ठरू शकते.

    आपण बऱ्याचदा आपले कान साफ करण्यासाठी आगपेटीच्या काडीचा वापर करतो किंवा एखादी पिन वगैरे कानात घालतो. परंतु ही कान साफ करण्याची चुकीची तसेच खूप धोकादायक पद्धत आहे. लोकांना आता या गोष्टीची माहिती झाली आहे, ज्यामुळे काही लोक आता कान साफ करण्यासाठी इअरबर्डचा वापर करतात.

    हे इअरबर्ड हे प्लास्टिक किंवा लाकडाचे असते, ज्यावर कापूस गुंडाळलेला असतो. यावर कापूस गुंडाळला असल्याने आपल्याला कानात काही इजा होणार नाही किंवा याचा त्रास होणार नाही असे आपल्याला वाटत जरी असले, तरी असे करणे देखील धोक्याचे ठरू शकते. हे इअरबर्ड तुमच्या कानात मॅचस्टिकसारखेच काम करतात. यामुळे तुमच्या कानालाही इजा होऊ शकते. त्यामुळे अशा स्थितीत जाणून घ्या की, इअरबर्ड तुमच्या कानासाठी किती हानिकारक आहेत.

    लोक काय करतात?
    खरं तर, लोक त्यांच्या कानातून घाण बाहेर काढण्यासाठी इअरबर्ड वापरतात. यासाठी ते सतत कानात इअरबर्ड घालतात आणि शक्य तितक्या आत घालतात. लोकांना असे वाटते की, असे केल्याने त्यांचे कान पूर्णपणे साफ होईल. पण असे करणे खूप महागात पडू शकते. असे केल्याने कानातील वॅक्स बाहेर तर येत नाही आणि उलट यामुळे अधिक समस्या येऊ शकतात.

    धोकादायक का आहेत?
    अनेक अहवालांमध्ये हे उघड झाले आहे की, कापसाचे बर्ड वापरल्याने थोडा आराम मिळू शकतो, पण त्यामुळे कानाचा वॅक्स निघत नाही. हे इअरबर्ड ते वॅक्स काढून टाकण्याऐवजी त्याला आणि घाणीला पुन्हा आत ढकलते. यामुळे हे मेण कानाच्या ड्रम किंवा कर्णमालाच्या जवळ जाते आणि त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, जेव्हा तुमच्या कानात वॅक्स जास्त असते तेव्हा ते तुमचे कान स्वतःच स्वच्छ ठेवते. त्यामुळे यासाठी तुम्हाल इअरबर्ड वापरण्याची गरज नाही.

    मग काय केले पाहिजे?
    अशा परिस्थितीत जर तुम्ही आंघोळ करताना तुमचे कान स्वच्छ केलेत तर ते जास्त चांगले ठरेल. कानातील वॅक्सदेखील आपल्या कानासाठी खूप फायदेशीर आहे, जे इतर संसर्गांना प्रतिबंधित करते. तसेच, हे कानासाठी एक प्रकारचे जाळे म्हणून काम करते, म्हणून त्याची उपस्थिती आपल्या कानासाठी देखील आवश्यक आहे.