मेंदूच्या पेशी देतात सकारात्मक-नकारात्मक अनुभव

प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सस्तन प्राण्यांच्या मेंदूत एक रहस्यमय, मात्र महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. त्याचा संबंध लोकांच्या मूडमधील बदलाशी असतो

आपल्याला जे सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव येत असतात त्याला आपल्या मेंदूतील पेशी जबाबदार असतात. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी दोन संशोधने करून याबाबतचे निष्कर्ष काढले आहेत.

त्यांनी म्हटले आहे, की प्रीफंटल पेशी बऱ्याच बाबतीत वेगळ्या असतात. त्यांच्यामुळे सकारात्मक किंवा नकारात्मक अनुभव येत असतात. प्रा. कार्ल डिसेरोथ यांच्या नेतृत्वाखाली याबाबतचे संशोधन करण्यात आले. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सस्तन प्राण्यांच्या मेंदूत एक रहस्यमय, मात्र महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. त्याचा संबंध लोकांच्या मूडमधील बदलाशी असतो; मात्र ते परस्परविरोधी क्रियांना कसे नियंत्रित करते हे अद्याप समजलेले नाही. परस्परविरुद्ध अशा मानवी भावभावनांना ही एकच बाब अशी नियंत्रित करीत असल्याने संशोधकांना त्याबाबत कुतूहल वाटत असून या पेशींबाबत आता अधिक संशोधन केले जात आहे.