crime branch nalasopara

नालासोपारामधील रमेश हुंबरकर यांचा फ्लॅट दुसर्‍या मजल्यावर असताना चोरट्याने किचनच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला होता.तसेच चोरी कधी झाली याची माहिती नसल्यामुळे या चोरीचा(house robbery) तपास करण्याचे आव्हान पोलीसांपुढे होते.त्यांनी सोसायटीच्या कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता,अंधारात एक इसम भिंतीवरून सरपटत चढत असल्याचे अंधुकसे दिसून आले.

    वसई: अंधुकशा सीसीटीव्ही फुटेजवरून (cctv footage)गुन्हे शाखेने(crime branch) नालासोपारातील(nalasopara) २५ लाख रुपयांच्या घरफोडीचा तपास लावला आहे. तसेच अशा तब्बल १५ घरफोड्या करणार्‍यांच्या सराईताच्या त्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. नालासोपारा पुर्वेकडील न्यु संगम इमारतीत राहणाने रमेश हुंबरकर हे ७ मार्चला सहकुटुंब गावी गेले होते.

    हुंबरकर १४ मार्चला परतल्यावर त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसेल.तसेच बेडखाली दडवून ठेवलेले १७ लाख रुपये रोख आणि दागिने असा सुमारे २४ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हुंबरकर यांचा फ्लॅट दुसर्‍या मजल्यावर असताना चोरट्याने किचनच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला होता.तसेच चोरी कधी झाली याची माहिती नसल्यामुळे या चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलीसांपुढे होते.त्यांनी सोसायटीच्या कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता,अंधारात एक इसम भिंतीवरून सरपटत चढत असल्याचे अंधुकसे दिसून आले.या फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेने त्याच्या शरीरयष्टी आणि देहबोलीवरून तसेच गुन्ह्याच्या पद्धतीने माग काढण्याचे ठरवले.त्यावेळी पोलीस नाईक मनोज सकपाळ यांना अशा पद्धतीने चोरी करणार्‍या या चोराची माहिती मिळाली.

    या माहितीच्या आधारे अब्दुल शेख (४३) याला अलकापुरीतील ओम नमः शिवाय इमारतीच्या दुकानातून मंगळवारी ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडून २९ तोळे सोन्याचे दागिने,२ किलो चांदीचे दागिने व नाणी आणि दुचाकी असा १८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याने हुंबरकर यांच्या दोन्ही बेडरुमच्या पलंगाखालील २५ तोळे सोने,१ किलो चांदी आणि १७ लाख रुपये चोरून नेले होते.त्यापैकी १९ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.शेख याच्यावर १५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अंगाने सडपातळ असल्यामुळे तो निमुळत्या जागेतून सहज जात होता .हुंबरकर यांच्या घरात त्याने तासाभरात सर्व दागिने शोधून काढले होते.