कर्करोगाचा इशारा: तरुण पिढीमध्ये शर्करायुक्त शीतपेयांमुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले

गुट या वैद्यकीय जर्नलमध्ये एक नवीन अभ्यास प्रकाशित झाला आहे. कोलोरेक्टल कॅन्सर आणि शर्करायुक्त शीतपेयांमधील संबंध शोधण्यासाठी या अभ्यासामध्ये ९४४६४ परिचारिकांचा समावेश होता. या परिचारिकांनी १९९१ ते २०१५ दरम्यान दीर्घकालीन संभाव्य आरोग्य अभ्यासासाठी नोंदणी केली, जेव्हा ते २५ ते ४२ वर्षांचे होते.

  तरुण तसेच प्रौढांमध्ये कोलन आणि गुदाशयाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. संशोधकांचा असा दावा आहे की शर्करायुक्त शीतपेयांमुळे कर्करोग वाढत आहेत.

  नजीकच्या काळात ५० वर्षांखालील लोकांमध्ये कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. १९५० च्या आसपास जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत, १९९० च्या आसपास जन्मलेल्या लोकांना कोलन कर्करोगाचा धोका दुपटीने आणि रेक्टल कॅन्सरचा धोका चारपटीने वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून शर्करायुक्त शीतपेयांच्या विक्रीत घट झाली आहे, परंतु १९७७ ते २००१ च्यादरम्यान या पेयांचा खप वेगाने वाढला होता . त्यामुळे तरुण वर्गात कॅलरी घेण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले.

  तरुण वर्गात डबल कॅलरी घेण्यास सुरुवात
  शर्करायुक्त शीतपेयांच्या सुरुवातीच्या काळात १९ ते ३९ वयोगटातील मुलांमध्ये कॅलरी वापरण्याची क्षमता ५. १ टक्क्यांवरून १२.३ टक्क्यांपर्यंत आणि १ ८ वर्षांखालील मुलांमध्ये ४.८ टक्क्यांवरून १०.३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तथापि २०१ ४ पासून या आकडेवारीत घट झाली असली तरी, प्रत्येक अमेरिकन वापरत असलेल्या कॅलरीपैकी ७ टक्के कॅलरी अजूनही शर्करायुक्त शीतपेयांच्या सेवनामुळे आहे.

  संशोधनासाठी ९४४६४ परिचारिका सहभागी
  गुट या वैद्यकीय जर्नलमध्ये एक नवीन अभ्यास प्रकाशित झाला आहे. कोलोरेक्टल कॅन्सर आणि शर्करायुक्त शीतपेयांमधील संबंध शोधण्यासाठी या अभ्यासामध्ये ९४४६४ परिचारिकांचा समावेश होता. या परिचारिकांनी १९९१ ते २०१५ दरम्यान दीर्घकालीन संभाव्य आरोग्य अभ्यासासाठी नोंदणी केली, जेव्हा ते २५ ते ४२ वर्षांचे होते.

  अभ्यासानुसार ४१,२७२ परिचारिकांच्या आरोग्याच्या समस्यांकडेदेखील बारकाईने पाहिले गेले.यामध्ये १३ ते १८ वर्षे वयोगटात शर्करायुक्त शीतपेय सेवन केलेल्यांची नोंद ठेवली. अभ्यासामध्ये, संशोधकांनी सॉफ्ट ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसालेदार चहा, तसेच फळांचे रस (सफरचंद, संत्री, द्राक्षे सारखी फळं) याची नोंद घेतली.

  आठवड्यातून दोन किंवा जास्त शर्करायुक्त शीतपेयांमुळे  कॅन्सरचा धोका दुप्पटीने
  अभ्यासातील महिलांच्या सुमारे २४ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर, संशोधकांना कोलोरेक्टल कर्करोगाची १०९ प्रकरणे आढळली. ज्या स्त्रिया आठवड्यातून दोन किंवा अधिक शर्करायुक्त पेय पितात त्यांना कर्करोगाचा धोका दुप्पट असल्याचे आढळले, ज्या स्त्रिया आठवड्यात फक्त एक साखरयुक्त पेय पितात त्या प्रत्येक गोड पेयच्या सेवनाने कर्करोगाचा धोका १६ टक्क्यांनी वाढतो.

  दिवसात एक साखरयुक्त पेय म्हणजे कर्करोगाचा ३२% धोका
  तरुण पिढीमध्ये दिवसातून एक शर्करायुक्त पेय सेवन केल्याने कर्करोगाचा धोका ३२ टक्क्यांनी वाढतो, परंतु कॉफी सेवन केल्याने कर्करोगाचा धोका १७ ते ३६ टक्क्यांनी कमी होतो.

  तरुण पिढीमध्ये कर्करोगाचा धोका जास्त 
  सेंट लुईसमधील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील शस्त्रक्रियेचे सहाय्यक प्राध्यापक आणि अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक यिन काओ म्हणतात की, इन्सुलिन प्रतिरोध किंवा उच्च कोलेस्ट्रॉल, आतड्यात जळजळ होण्यासारख्या चयापचय समस्यांमुळे कर्करोग होण्याची शक्यता जास्त वृद्धांपेक्षा तरुण पिढीमध्ये असते. या प्रकारच्या कर्करोगाचे लठ्ठपणा देखील एक प्रमुख कारण असू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की उच्च फ्रुकटोज कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा आणि त्यानंतरच्या कर्करोगाचा धोका वाढतो.