weight loss by carom seeds

ओव्याची(carom seeds) चव अनेकांना आवडत नाही. मात्र ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. तसेच ओव्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सचे प्रमाणही शरीराला पूरक असे असते. ओवा तुमचा लठ्ठपणा कमी करु शकतो. कसे ते जाणून घेऊयात.

    ओवा आपण जेवणात अनेकदा जेवणात वापरतो . कारण ओव्यामध्ये (Carom Seeds) अनेक पाचक गुणधर्म असतात. ओव्याची चव अनेकांना आवडत नाही. मात्र ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. तसेच ओव्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सचे प्रमाणही शरीराला पूरक असे असते. ओवा तुमचा लठ्ठपणा कमी करु शकतो. कसे ते जाणून घेऊयात.

    लठ्ठपणा कमी करण्यासाठी ओव्याचा एक प्रयोग तुम्ही करुन पाहा. दीड ग्लास पाण्यात एक चमचा ओवा रात्री भिजवून ठेवा. सकाळी त्या पाण्यामध्ये ओवा उकळू दे. हे पाणी प्या. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्या.असे केल्याने तुमच्या शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.

    • जर तुम्हाला पोटदुखी, गॅस, अपचन असा त्रास होत असेल तर ओव्यासह काळे मीठ आणि चिमूटभर हिंग एकत्र करुन खा.
    • ओवा केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतो. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा कढीपत्ता, मनुका, साखर आणि ओवा घालून त्याचा काढा तयार करा. या काढ्याचे रोज सेवन केल्यामुळे केस अकाली पांढरे होणार नाहीत.
    • तुम्हाला जर मुरुमांचा त्रास असेल तर पाण्यात ओवा मिसळून पेस्ट बनवा. मुरुमांच्या जागी १० ते १५ मिनिटे लावा. यामुळे मुरुमांपासून मुक्ती मिळेल.