सतत लिंबूपाणी पिता?; मग त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या

अनेक वेळा लोक अन्न पचवण्यासाठी लिंबूच्या रसाचे सेवन करता. कारण यामधील अॅसिड अन्न पचवण्यास मदत करते.

  जास्त लोक सकाळी उठल्या बरोबर लिंबू पाण्याचे सेवन करतात. वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराला स्वच्छ करण्यासाठी असे केले जाते. पाण्यात लिंबूचा रस टाकून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर मिळते. परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही साइड इफेक्ट होतात. जास्त लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. डिहायड्रेशनची समस्या वाढते. याव्यतिरिक्त अनेक लोकांना दातांचा त्रास होतो. जास्त लिंबू पाणी प्यायल्याने अनेक समस्या होऊ शकतात. चला तर मग जाणुन घेऊया जास्त लिंबू पाणी प्यायल्याने कोणत्या समस्या होतात.

  किडनी आणि पित्ताशयाची समस्या
  लिंबूमध्ये अॅसिड सोबतच ऑक्सलेटसुध्दा असते. जो जास्त प्रमाणात शरीरात गेल्यावर क्रिस्टल बनु शकतो. हा क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट, किडनी स्टोन आणि गॉलस्टोनची जागा घेऊ शकतो.

  डिहायड्रेशन
  लिंबू पाणी प्यायल्याने वेळोवेळी मुत्रविसर्जन करावे लागते. ज्यामुळे बॉडीमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळेच तुम्ही जेव्हा लिंबू पाणीचे सेवन कराल तेव्हा नंतर थोड्या वेळाणे पाणी पित राहा.

  दातांना त्रास
  लिंबूमध्ये सिट्रस अॅसिड असते. ज्याचा दातांशी जास्त संपर्क आल्याने दात संवेदनशील होतात. जर तुम्हाला लिंबू पाणी प्यायचे असेल तर स्ट्रॉने प्या. ज्यामुळे पाण्याचा स्पर्श दातांना होणार नाही.

  छातीमध्ये जळजळ
  जर तुम्हाला अॅसिडीची समस्या असेल तर लिंबूचे सेवन कमी करा. यामध्ये जास्त अॅसिड असते. यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो.

  ही काळजी घ्या
  लिंबू पाणीचा वापर आजार दूर करण्यासाठी करू नका. जर तुम्हाला हे सेवन केल्याने काही साइड इफेक्टची जाणीव होत असेल तर लगेच हे बंद करा. जर तुम्हाला व्हिटॅमिन ‘सी’ साठी लिंबू पाणी प्यायचे असेल तर पाण्यात फक्त लिंबू पिळून अर्धा ग्लास पाण्यात मिळवून प्या.

  पोट खराब होऊ शकते
  अनेक वेळा लोक अन्न पचवण्यासाठी लिंबूच्या रसाचे सेवन करता. कारण यामधील अॅसिड अन्न पचवण्यास मदत करते. परंतु पोटात जास्त अॅसिड झाल्याने पोट खराब होते. यामुळे लिंबू नेहमी जेवणात मिळवूनच सेवन करावा.