मायक्रोव्हेवमध्ये अन्न शिजविता?; मग त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या

मायक्रोवेवमध्ये जेवण शिजवणं किंवा गरम करणं वेळ वाचवणारं आणि सोपं  असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर  होतो. मायक्रोवेव्ह सारख्या विद्युत उपकरणांमुळे आपलं स्वयंपाकघर खरोखरच आधुनिक बनते, पण...

    कधी चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळणारे मायक्रोव्हेव ओव्हन आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातला अविभाज्य भाग बनला आहे. मायक्रोवेवमध्ये जेवण शिजवणं किंवा गरम करणं वेळ वाचवणारं आणि सोपं  असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर  होतो. मायक्रोवेव्ह सारख्या विद्युत उपकरणांमुळे आपलं स्वयंपाकघर खरोखरच आधुनिक बनते, पण ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

    मेडिकल डेलीमध्ये देण्यात आलेला रिपोर्टनुसार, फिजिशियन डॉक्टर जोसेफ मोरोक्को यांच्या मते आपण आपलं पोषक घटक असलेलं अन्न मायक्रोवेवमध्ये ठेवतो मात्र, त्याला इलेक्ट्रिक हीट मिळाल्यामुळे ते ‘डेड फूड’ होऊन जातं. म्हणजेच त्यातली सगळी पोषद द्रव्य नष्ट होतात.

    पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गेल्यानंतर त्यातील वॉटर मॉलेक्‍यूल्‍स तात्काळ उडून जातात आणि त्यानंतर जेवण वेगाने गरम व्हायला लागतं. या प्रक्रियेमुळे जेवणातल्या पोषक घटकांचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्यामुळेच पोषक घटक हानिकारक न्यूट्रिएंट्समध्ये बदलून जातात.

    अनेक संशोधकांच्या मते मायक्रोवेव्ह मधलं जेवण दररोज घेतल्यामुळे रोग प्रतिकारक्षमता देखील कमी होऊन जाते. एवढंच नाही तर गर्भवती महिलेने मायक्रोवेव्ह मधलं जेवण खाल्ल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला जन्मापासूनच व्यंग येऊ शकतात. याशिवाय मायक्रोवेवचा सतत वापर केल्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढलेला असतो. मायक्रोवेवमध्ये जेवण करणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब या सारखे त्रास ही दिसून येतात.