क्रॅश डाएटमुळे जडत आहे हृदयाचे आजार; हे आहे कारण

वजन वाढेल या भीतीने अनेकजण जास्त खात नाहीत तर काहीजण वजन कमी करण्यासाठी डाएटचा फंडा वापरतात. झटपट वजन कमी करायचे असेल तर बहुतेक जण क्रॅश डाएटचा वापर करतात.

    क्रॅश डाएटमध्ये कॅलरीजचे प्रमाण मर्यादित ठेऊन कमी कालावधीत वजन कमी करता येते. या डाएटमुळे त्वरित वजन कमी होते हे खरे. मात्र, याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, क्रॅश डाएट फॉलो केल्यामुळे दीर्घकालीन हृदयाचे आजार होऊ शकतात.

    वजन वाढेल या भीतीने अनेकजण जास्त खात नाहीत तर काहीजण वजन कमी करण्यासाठी डाएटचा फंडा वापरतात. झटपट वजन कमी करायचे असेल तर बहुतेक जण क्रॅश डाएटचा वापर करतात. क्रॅश डाएटमध्ये कॅलरीजचे प्रमाण मर्यादित ठेवून कमी कालावधीत वजन कमी करता येते. या डाएटमुळे त्वरित वजन कमी होते हे खरे मात्र याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

    डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, क्रॅश डाएट फॉलो केल्यामुळे दीर्घकालीन हृदयाचे आजार होऊ शकतात. या डाएटमुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो आणि हृदयाची रक्त पंप करण्याची ताकदही कमी होते. हृदयाचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी हे अशा प्रकारचे डाएट करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण यामुळे हार्ट फेल होण्याची शक्यता असते. क्रॅश डाएटमुळे शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता भासते. यामुळे रक्तात कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सचे प्रमाण वाढून अनेक हृदयाचे आजार बळावण्याची शक्यता असते. प्रत्येक व्यक्तीची शरीररचना वेगवगेळी असते. त्यामुळे तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक असते. त्यामुळे आहारतज्ज्ञही शरीररचनेप्रमाणे व्यक्तींना डाएटचा सल्ला देतात. अशावेळी तज्ज्ञ, व्यक्तींच्या आरोग्याच्या समस्या आणि कुटुंबाची माहितीही जाणून घेतात.