तजेलदार, नितळ त्वचेसाठी ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा

क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील

    सुंदर, तजेलदार, त्वचेसाठी अनेकदा पार्लरमध्ये हजारो रुपये तरुण तरुणी खर्च करत असतात. परंतु या सगळ्या गोष्टी बाजूला सारत घरगुती पद्धतीने काही उपाय केल्यास नितळ, तजेलदार त्वचा होण्यास होते. तसेच या प्रकारच्या उपायामुळे तत्वचेला कोणत्याही प्रकारची इजाही होत नाही. चेहऱ्यावरील काळे डाग , वृद्धत्वाची लक्षणे आपल्या चेहऱ्यावरून गायब होण्यास मदत होते

    साहित्य २ चमचे क्ले, २ एक्टिवेटिड कॅप्सूल, २ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, एक थेंब तेल या सर्व गोष्टी एका भांड्यात चांगल्या मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि १५ मिनिटानंतर तोंड धुवा. हा फेसपॅक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते त्वचेतून जादा तेल काढून टाकण्याचे काम करते. याशिवाय अॅपल सायडर व्हिनेगरचे थेंब आणि तेल मुरुमांशी लढण्यास मदत करतात.

    अंड्याचा पांढरा भाग, ३ एक्टिवेटिड कॅप्सूल, एक चमचा लिंबाचा रस हा फेसपॅक तयार करण्यासाठी अंड्याचा पांढर्‍या भाग, एक्टिवेटिड कॅप्सूल आणि लिंबाचा रस चांगला मिक्स करून घ्या आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट सुमारे १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. जेव्हा हा फेसपॅक चांगला कोरडा होईल त्यावेळी कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे. यामुळे आपली त्वचा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होते.

    क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील. ही उत्पादने निवडताना प्रथम आपल्या त्वचेचा पोत लक्षात घेऊन मगच त्या उत्पादनांची खरेदी करावी रा.