असह्य दातदुखीने त्रस्त आहात?; मग करा ‘हे’ उपाय

दातदुखी अत्यल्प प्रमाणात असल्यास घरगुती उपचारांनी तसेच होमिओपॅथिक उपचारांनी कमी होते; परंतु तसे असूनही दंतवैद्याचा सल्ला मात्र जरुर घ्यावा.

    काहीवेळा दातदुखी ( Dental problem) खूप असह्य होते. दातातून सतत कळा, ठणका येत राहतात. दुखर्‍या दातावर लगेचच योग्य उपचार केले नाहीत तर दात काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाहीत. चुकीच्या आहार पद्धतीमुळेही दात किडू लागतात. कारण हेच दातदुखीचे प्रमुख कारण आहे.

    आईस्क्रीम, शीतपेये, केक यासारखे गोड पदार्थ खाल्ल्याने दातावर त्याचा राप बसतो व कीटन तयार होते. तोंडातील जीवाणूमुळे गोड पदार्थांतील साखरेचे आम्लात रूपांतर होते. दातांवरील आवरणात कॅल्शियम असते. या कॅल्शियमचा आम्लाशी संयोग होऊन या आवरणाची झीज होते. तसेच दात किडू लागतात.

    दातदुखी अत्यल्प प्रमाणात असल्यास घरगुती उपचारांनी तसेच होमिओपॅथिक उपचारांनी कमी होते; परंतु तसे असूनही दंतवैद्याचा सल्ला मात्र जरुर घ्यावा. गोड खाल्ल्याने दात दुखत असेल तर न्रट्रम कार्ब हे औषध उपयुक्‍त आहे. दात किडून दातांच्या मुळांशी खूप दुखते. दातांवर दाब पडल्यास अतिशय  कळ येते.

    जबड्याची हालचाल झाल्यावर कळ कपाळापर्यंत जाणवते. स्पर्श व थंड पदार्थ किंवा पाणी अजिबात सहन होत नाही. अशा लक्षणावर स्टॅफीसॅगीया हे औषध वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावे. अशा घरगुती किंवा होमिओपॅथिक पद्धतीने दातांचे असह्य दुखणे कमी होऊ शकते.