milk

दूध (Milk drinking) आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर(benefits of milk) आहे. मात्र दूध पिताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण काही पदार्थ दूध प्यायल्यानंतर खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. (do not eat these food items with milk)हे पदार्थ कोणते ते पाहूयात.

  दूध (Milk drinking) आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर(benefits of milk) आहे. दूधाला(milk) परिपूर्ण भोजनाचा पर्याय म्हणूनही पाहिले जाते. दूधापासून आपल्या शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम तर मिळतेच पण त्याशिवाय दूधामध्ये असलेले मिनरल्स आणि व्हिटॅमिन आल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. आपली हाडं दूधामुळे मजबूत होतात.

  woman drinking milk

  मात्र दूध पिताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण काही पदार्थ दूध प्यायल्यानंतर खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. (do not eat these food items with milk)हे पदार्थ कोणते ते पाहूयात.

  ब्रेड आणि बटर (Bread Butter)

  bread and butter

  नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खाणं अनेकांना आवडतं. अनेक लोकं सकाळी नाश्ता करताना दूधासोबत ब्रेड बटर खातात. दूध, ब्रेड आणि बटर एकत्र खायला चांगलं लागत असेल पण याचे एकत्र सेवन केल्याने पित्त होऊ शकते. यामुळे तुम्हाला उलट्या देखील होऊ शकतात.

   मसालेदार पदार्थ (Spicy Snacks)

  spices

  आपण दूध प्यायले असेल आणि त्यानंतर तिखट पदार्थ खात असाल तर ती चुकीची सवय आहे.कारण हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक होऊ शकते. असे केल्याने तुम्हाला गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते.

  संत्रे (Oranges)

  orange and milk
  संत्र्याच्या सेवनाने व्हिटॅमीन सी मिळतं. मात्र दूध आणि संत्रं एकत्र खाऊ नका. दूधामध्ये असलेले कॅल्शियम फळांमध्ये असलेल्या एन्झाइम्स शोषून घेतात. त्यामुळे शरीराला त्याचे पोषण मिळू शकत नाही. दूध आणि संत्रे एकत्र खाल्ल्याने  गॅसची समस्या उद्भवू शकते.

  मुळा (Radish)

  raddish and milk

  दूध प्यायल्यानंतर मूळा खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दूध आरोग्यासाठी फायद्याचे असले तरीही या लेखात सांगितलेल्या पदार्थांबरोबर त्याचे सेवन करू नका.