घरच्या घरी असे करा पेडिक्युअर; पायांच्या अनेक समस्यांवर घरघुती उपाय

ग्लिसरिन, लिंबु आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ अन छान होतात.

  घरच्या घरी पेडिक्युअर करण्यासाठी,  पायांसाठी आराम,  पायांच्या भेगांसाठी,  पायांच्या चिखल्यांसाठी,  ई जीवनसत्त्वयुक्त घटक,  सौंदर्य, गरम पाण्यात शँपु, थोडंसं ग्लिसरिन (नाहीतर खूप कोरडी होतात पावलं), हायड्रोजन पॅरॉक्साइड (बहुदा मळ सुटुन येतो लवकर म्हणून घालतात) हे घालावं. १०-१५ मिनिटं ह्या पाण्यात पाय घालून पाय, टाचा, नखं वैगरे साफ करावं. नंतर पाय पुसून एखाद्या ऑल परपज क्रिम किंवा फ्रूट क्रिमने पायाला मसाज करावा. वेळ अन हौस असेल तर पाण्यात पाय घालायच्या आधी स्वच्छ धूवून क्लिनसिंग मिल्क लावून पुसावेत अन एखादे ब्लिच क्रिम लावावे. शेवटी मसाज केल्यावर एखादा पॅकपण लावता येतो.

  ग्लिसरिन, लिंबु आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ अन छान होतात. कधीकधी लिंबाची फोड, साल वैगरे पावलांवर घासली तर राप निघून जातो. मोहरीचे तेल व मिठ यांनी हलका मसाज केला तर मऊपणा येतो.

  रोज आंघोळ करताना एखाद्या स्क्रब किंवा प्युमिस स्टोनने टाचा, तळपाय चोळावेत. आंघोळ झाल्यावर त्वचा ओलसर असताना बेबी ऑइल किंवा निव्हिआसारखे हेवी क्रीम लावावे.

  रात्री पाय स्वच्छ धुऊन, भरपूर पेट्रोलियम जेली चोपडून त्यावर सुती मोजे चढवून झोपायचे. टाचा कोरड्या पडत असतील तर हे नियमित केल्याने खूप फरक पडतो.

  पायाचं वॅक्सींग करताना पावलांवरूनही (तळपाय नव्हे) थोड्या पट्ट्या ओढाव्यात. डेड स्कीन निघून येण्यास मदत होते. त्यामुळे काळवंडलेली पावले थोडी उजळायलाही मदत होते. हल्ली ते “पेडएग” म्हणून छोटं स्क्रबर मिळतं तेदेखील खूप उपयोगी आहे. दोन पेडीक्युअरच्या मध्ये वापरायला छान आहे.

  मिनरल ऑइल (किंवा एरंडेल तेल), ग्लीसरीन, आपल्या आवडीचे बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर सम-सम प्रमाणात एकत्र एका बाटलीत भरून ठेवायचे. आंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे. तिथे लावायचे, त्वचेत चांगले जिरले पाहीजे. त्वचा मऊ होते.

  पायाला वास येऊ नये म्हणून टाल्कम पावडर किंवा बेबी पावडर पायांवर शिंपडावी. आपल्या पायाच्या आकाराला योग्य व सुखदायी वाटेल अशी चप्पल किवा बूट याची निवड करावी.