‘यु ट्यूब’वरचे व्हिडीओ बघून डायटिंग करताय? मग आधी वाचा

चुकीच्या डायट प्लॅनमुळे सतत वजन वाढवणे आणि घटवणे ही प्रक्रिया, स्नायूंचे वजन कमी होणे, रक्तदाब वाढणे, अशा गोष्टींसाठी कारणीभूत ठरते असा काही अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

  आपल्या समस्यांवर समाधान शोधण्यासाठी अनेक जण यु ट्यूबच्या व्हिडीओची मदत घेतात. डायटिंगच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. तुम्हीसुद्धा असेच व्हिडीओ पाहून डायटिंग करत असाल तर सावध होण्याची गरज आहे. यु ट्यूबवर उपलब्ध असलेले जास्तीत जास्त  व्हिडीओ हे व्हूज मिळविण्यासाठी बनविले जातात. लोकांना सोपे वाटणारे अनेक कंटेट तेथे टाकला जातो. ही मंडळी कुणी तज्ज्ञ नसतात त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेऊन उपाय केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकते.

  चुकीच्या डायट प्लॅनमुळे सतत वजन वाढवणे आणि घटवणे ही प्रक्रिया, स्नायूंचे वजन कमी होणे, रक्तदाब वाढणे, अशा गोष्टींसाठी कारणीभूत ठरते असा काही अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. सतत परावृत्त केले जात असेल, तर ही प्रक्रिया तुमचे मानसिक खच्चीकरणसुद्धा करू शकते. आहार आणि व्यायाम यांच्यात योग्य तो बदल करण्याची वेळ, म्हणजे वजनात झालेली वाढ होय. मात्र हे बदल हळूहळू करण्यात यावेत. जेणेकरून ते तुमच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग बनत जातील. अर्थातच नाही. वजन घटवणे शक्य होण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. मात्र आहारातील अचानक होणारे बदल, हानिकारक ठरू शकतो.

   

  नियमित व्यायाम
  नियमित व्यायामामुळे हृदयाचे कार्य उत्तम राहते. छोट्या गोष्टींसाठी करण्यात येणारी धावपळ, जिने चढणे अशा छोट्या कामांमध्ये थकवा जाणवत नाही. नियमित व्यायामामुळे हृदयविकारासाठी कारणीभूत असलेल्या सिरम कोलेस्टेरॉलचे प्रमाण मर्यादित राहण्यास मदत होते. दर आठवड्याला 900 ते 1200 कॅलरीज कमी होतील असा व्यायाम असणे आवश्यक आहे.

  चालणे : चालणे हा उत्तम व्यायाम आहे. चालण्याने साधारणतः तासाला 300 कॅलरीज कमी करणे शक्य आहे.

  चढावर चालणे : चढाई असलेल्या ठिकाणी चालणे अधिक श्रेयस्कर ठरते. तासाला 400 कॅलरीज घटवणे याने शक्य होते.

  पोहणे : संपूर्ण शरीराला व्यायाम मिळेल असा हा उत्तम पर्याय म्हणजे पोहणे. ताशी 400 कॅलरीज पोहण्यानेही कमी करता येतात.

  जॉगिंग : तासाला 400 कॅलरीज कमी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे जॉगिंग. चालण्याच्या कुठल्याही ठिकाणी, चालण्याऐवजी जॉगिंग करणे अधिक फायदेशीर आहे.