आरोग्यवर्धक मानून तुम्ही फणसाच्य बिया खाता?; तर मग लगेच व्हा सावध!

निरोगी  राहण्यासाठी आपण अनेक घरघुती उपाय करत असतो. त्यापैकी एक म्हणजे अनेक जण फणसाच्या बियांचे सेवन करतात.

    निरोगी  राहण्यासाठी आपण अनेक घरघुती उपाय करत असतो. त्यापैकी एक म्हणजे अनेक जण फणसाच्या बियांचे सेवन करतात. अनेकांना याचे फायदे माहिती असतील परंतु फणसाच्या बिया सेवन कारण्याचरे काही तोटे देखील आहेत.

    रक्त पातळ होते

    रक्त गोठल्यामुळे बरेच लोक रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात. अशा लोकांनी चुकूनही आहारात फणसाच्या बिया घेऊ नयेत. कारण फणसाच्या बिया खाल्ल्याने रक्त गोठण्याची शक्यता असते. ज्या लोकांना चयापचयची समस्या आहे अशांनी आहारात फणसाच्या बिया खाणे टाळावे.

    साखरेची पातळी होतो कमी 

    फणसाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. जर एखाद्या व्यक्तीला साखर किंवा हायपोग्लाइसीमिया असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फणसाच्या बिया आहारात घ्याव्यात. याशिवाय मधुमेहाचे रुग्ण साखर कमी करणारी औषधे घेत आहेत असतील तर त्यांनी देखील फणसाच्या बिया खाणे टाळावे.