एकाच टूथब्रश बराच काळ वापरता?; मग हे नक्की वाचा

जर तुम्हाला व्हायरस किंवा फंगसशी संबंधित काही आजार झाला असेल तर तुम्ही बरे झाल्यानंतर ब्रश लगेच बदलावा. कोरोना व्हायरस दरम्यान अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी निगेटिव्ह झाल्यावर ब्रश बदलावा.

    दररोज सकाळी उठून तुम्ही ब्रश करत असाल. जे लोक आपल्या दातांची खास काळजी घेतात, ते शहानिशा करूनच टूथब्रशची निवड करतात. पण एकदा टूथब्रश खरेदी करून हे विसरून जातात आणि बरीच वर्ष एकच ब्रश वापरतात राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठराविक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्याने तुमचे दात आणि हिरड्यांसाठी नुकसानकारक ठरते.

    द सेंटर्स फॉर डिजीज प्रिवेंशन अॅन्ड कंट्रोलनुसार, व्यक्तीने 3 ते 4 महिन्यांनंतर आपला टूथब्रश बदलावा. याचा अर्थ असाही नाही की, ब्रश खराब झाल्यावरही तुम्ही चार महिन्यांपर्यंत वाट बघावी. जर तुमच्या ब्रशचे ब्रिशल खराब झाले असतील, तुटत असतील किंवा पूर्णपणे वाकले असतील तर तुम्ही वेळीच ब्रश बदलण्याची गरज आहे.

    कशी कळेल वेळ?
    तसे तर ब्रशचे दाते पाहून तुम्हाला हे समजू शकते की, ब्रश बदलण्याची वेळ झाली आहे. जसे की, ब्रशचे ब्रिशल तुटत असतील तर तो वेळीच बदलावा. अनेक लोकांचे मत आहे की, ब्रिशलच्या खालच्या भागात पांढरा थर जमा झाले असेल तर वेळीच ब्रश बदलावा. जास्त काळ एकाच ब्रशचा वापर करणे दातांसाठी चांगले ठरत नाही.

    आजारांची शक्यता
    जर तुम्हाला व्हायरस किंवा फंगसशी संबंधित काही आजार झाला असेल तर तुम्ही बरे झाल्यानंतर ब्रश लगेच बदलावा. कोरोना व्हायरस दरम्यान अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी निगेटिव्ह झाल्यावर ब्रश बदलावा. तुमच्या ब्रश इतरांच्या ब्रशसोबत ठेवत असाल तर त्यांनाही तुमचा आजार होऊ शकतो. अशात आजारा दरम्यानचा ब्रश लगेच बदलावा.