तुम्हीसुद्धा मास्क लावून मॉर्निग वॉक करता? मग लगेच व्हा सावध!

मागील वर्षी चीनमधील एका 26 वर्षीय तरुणाचे फुफ्फुस फुटले होते. तरुण मास्क लावून धावत होता. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, तरीही त्याने धावणे सुरु ठेवले होते. धावत असतानाच तो कोसळला आणि त्याला वुहान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

  कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे अत्यंत महत्वाचे आहे. गर्दीच्या ठिकाणी ते पलायलाच हवे, मात्र मॉर्निग वॉकला जाताना किंवा व्यायाम करताना जर तुम्ही मास्कचा वापर करत असाल तर त्याचे विपरीत परिमाण तुम्हाला भोगावे लागु शकतात .

  मागील वर्षी चीनमधील एका 26 वर्षीय तरुणाचे फुफ्फुस फुटले होते. तरुण मास्क लावून धावत होता. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, तरीही त्याने धावणे सुरु ठेवले होते. धावत असतानाच तो कोसळला आणि त्याला वुहान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ‘तरुणाचे डावे फुफ्फुस 90 टक्के संकुचित झाले होते. त्यामुळे त्याचे हृदय शरीराच्या उजव्या बाजूला सरकले. अशा प्रकारची स्थिती निर्माण होते याला pneumothorax असं म्हटलं जातं. अशाप्रकारची घटना दुर्मिळ असते. यामध्ये फुफ्फुस आणि छातीच्या मध्ये हवा जमा होते. ज्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो.’ मास्क लावून धावल्याने तरुणामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती. अशाच प्रकारच्या इतर काही घटना समोर आल्या होत्या.

  व्यायाम करताना मास्क का लावू नये
  व्यायाम करताना कधीही मास्क लावू नका. तुम्ही घराबाहेर व्यायाम करत असाल तरीही तुम्ही मास्क लावणे शक्यतो टाळा. पण, तुम्ही सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. व्यायाम करताना कोणत्याही व्यक्तीपासून 6 फूट दूर रहा. कोरोना विषाणू हा संसर्ग जन्य आजार आहे. हवेच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो.

  व्यायाम करताना मास्क लावण्याचे धोके
  कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहण्याचा तुमचा हेतू असला तरी यात अनेक धोके आहेत. व्यायाम करताना आपण जास्त प्रमाणात ऑक्सिजन आत घेतो, त्यामुळे आपल्या फुफ्फुसांना अधिक काम करावं लागतं. मास्क घातल्याने फुफ्फुसात जाणाऱ्या हवेवर निर्बंध येतात. ज्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवू शकतो. शिवाय व्यायाम करतेवेळी मास्क घामामुळे भिजतो. याचाही दुष्परिणाम होतो.