तुम्हाला रात्री नीट झोप लागत नाही? सतत चिंता वाटते? ही आहेत ‘कोरोनासोम्निया’ची लक्षणं

कोरोनामुळे होणाऱ्या मानसिक आजारांचं प्रमाण मोठं आहे. आता लॉकडाऊन उठला असला आणि सर्व काही सुरळीत होत असलं, तरी अनेकांना अधूनमधून लॉकडाऊनची भीती वाटत राहते. रात्री झोपेतून अचानक जाग येते आणि लॉकडाऊन तर सुरु होणार नाही ना, अशी चिंता सतावू लागते. अनेकांना आपली नोकरी जाईल असं वाटतं. अनेकांना अजूनही आपल्याला कोरोना होईल याची भीती सतावते. त्यात बातम्या, सोशल मिडिया आणि इतर माध्यमातून सतत काही ना काही कोरोनाबाबतची माहिती मेंदूत प्रवेश करत असते. 

    कोरोना हा शारिरीक आजार असला तरी त्याचे मोठ्या प्रमाणावर मानसिक परिणाम झाल्याचंही सिद्ध झालंय. कोरोना काळात झालेल्या कडक लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागला होता. काहीजणांना नोकरी गमवावी लागल्यामुळे, काहीजणांना नोकरी गमावण्याच्या भीतीने, काहीजणांना कोरोना होण्याच्या भीतीने, काहीजणांना घरच्या समस्यांनी वेढलं होतं.

    कोरोनामुळे होणाऱ्या मानसिक आजारांचं प्रमाण मोठं आहे. आता लॉकडाऊन उठला असला आणि सर्व काही सुरळीत होत असलं, तरी अनेकांना अधूनमधून लॉकडाऊनची भीती वाटत राहते. रात्री झोपेतून अचानक जाग येते आणि लॉकडाऊन तर सुरु होणार नाही ना, अशी चिंता सतावू लागते. अनेकांना आपली नोकरी जाईल असं वाटतं. अनेकांना अजूनही आपल्याला कोरोना होईल याची भीती सतावते. त्यात बातम्या, सोशल मिडिया आणि इतर माध्यमातून सतत काही ना काही कोरोनाबाबतची माहिती मेंदूत प्रवेश करत असते.

    सतत एकाच गोष्टीचा विचार करणे, त्यातून चिंता निर्माण होणे, काळजी वाटणे, पहाटेच्या वेळी अचानक धक्का बसल्याप्रमाणे जाग येणे या लक्षणांना इनसोम्निया असं म्हटलं जातं. मात्र सध्या हे प्रकार कोरोनाच्या संदर्भात होत असल्यामुळे कोरोनासोम्निया हा नवा मानसिक आजार असल्याचं दिसू लागलंय. या आजारामुळे अनेकांचं जगणं अवघड झालं असून प्रत्यक्ष समस्येपेक्षा समस्यांचा विचार आणि कल्पनाच हैराण करत असल्याचं चित्र आहे.

    हे दुष्टचक्र असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. मनावरचा ताण वाढल्यामुळे झोप येत नाही. झोप न आल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे तार्किक विचार न करता मेंदू अधिकाधिक भावनिक विचार करतो. भावनिक विचारांमुळे मनावरचा ताण वाढतो आणि पुन्हा यामुळे झोप कमी होते. या चक्रात अडकलेली व्यक्ती योग्य मानसोपचारांनी बाहेर पडू शकते. मात्र तुमच्यात अशी काही लक्षणे दिसत असतील, तर लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञांना भेटून त्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.