कोरोनाची लस घेतल्यावर ‘सेक्स लाईफ’वर परिणाम होतो का?; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

अनेकांना ताप येणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे असे अनेक त्रास होत असल्याचं आढळलं आहे. तसेच लसीकरण झाल्यानंतर लैंगिक आयुष्यावर परिणाम होत...

    कोरोनाला हरविण्यासाठी सध्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अमेरिका, रशिया, चीन, भारत यांनी विकसित केलेल्या लसी दिल्या जात आहेत. नवनवीन लसींचे संशोधनही सुरू आहे. जितक्या जास्त लशी येतील तितकं जास्त वेगानं लसीकरण होऊ शकणार आहे. तसंच कोरोनाचा विषाणूही सतत आपली रूपं बदलत असल्यानं त्यावर प्रभावी ठरतील अशा लसींची आवश्यकताही आहेच.

    सध्यातरी लसीकरण हाच या विषाणूवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, मात्र या लसीबाबतही अनेक समज, गैरसमज पसरत असतात. लस घेतल्यावर अनेकांना ताप येणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे असे अनेक त्रास होत असल्याचं आढळलं आहे. तसेच लसीकरण झाल्यानंतर लैंगिक आयुष्यावर परिणाम होत असल्याच्या अफवाही काही समाज कंटक पसरवीत आहेत, मात्र कोरोना लसीचा लैंगिक आरोग्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.