oxymeter

ऑक्सिमीटर(oxymeter) हे रक्तामधील ऑक्सिजनच्या पातळी(oxygen level) सांगणारं एक छोटंसं यंत्र आहे. जे बोटांत किंवा कानात बसवून तपासणी केली जाते. पण आता तज्ज्ञांचं असं मत आहे की, या यंत्रालाही काही मर्यादा(limitations of oxymeter) आहेत. काही वेळा या यंत्राद्वारे दिलेली माहिती चुकूही शकते.

    कोरोनाचा प्रसार(corona spread) वाढल्यापासून पल्स ऑक्सिमीटरचा(pulse oxymeter) वापर वाढू लागला. कोरोना रुग्णांमधील ऑक्सिजनचं प्रमाण(oxygen level) कमी होतं म्हणून एक मूलभूत चाचणी करणारं यंत्र म्हणून सगळ्यांनी ऑक्सिमीटरचा स्वीकार केला. मात्र हे ऑक्सिमीटर कितपत उपयुक्त(use of oxymeter) आहे, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    ऑक्सिमीटर हे रक्तामधील ऑक्सिजनच्या पातळी सांगणारं एक छोटंसं यंत्र आहे. जे बोटांत किंवा कानात बसवून तपासणी केली जाते. या यंत्राद्वारे इन्फ्रारेड किरणांच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी किती आहे , हे पाहता येेते. पण आता तज्ज्ञांचं असं मत आहे की, या यंत्रालाही काही मर्यादा आहेत. काही वेळा या यंत्राद्वारे दिलेली माहिती चुकूही शकते.

    एफडीए या आरोग्यविषयक संस्थेच्या मते, “प्रत्येक वेळी ऑक्सिमीटरपासून योग्य माहिती मिळेलच असं नाही. त्यामुळे कोरोनाचे निदान किंवा विषाणूची लागण झाले की नाही हे सांगण्यासाठी त्याचा वापर होऊ शकत नाही.काळी त्वचा असलेल्या लोकांबाबतीत हे यंत्र योग्य रीडिंग देत नाही. त्वचेची चरबी, त्वचेचं तापमान, तंबाखूचा वापर आणि नखांवर लावलेल्या नेल पॉलिशमुळे ऑक्सिमीटरचं रीडिंग चुकीचे येऊ शकण्याची शक्यता आहे. एफडीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लोक आपल्या घरीच कोरोना आहे की नाही हे पाहण्यासाठी या यंत्राचा वापर करतात. मात्र काही बाबतीत हे यंत्र अचूक माहिती देण्यास अपुरे पडते, हे लक्षात ठेवायला हवे.

    जर चेहरा, ओठ आणि नखांवर निळेपणा दिसून आला, श्वास घ्यायला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ लागला, छातीत दुखू लागले किंवा हृदयाचे ठोके वाढल्यासारखी स्थिती निर्माण झाली तर लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी.
    अशा परिस्थितीत ऑक्सिमीटरवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका असा सल्ला देण्यात आला आहे.