दुपारी जास्त वेळ झोपू नका; फक्त 30 मिनिटे झोपणे फायदेशीर

जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागे रहात असाल किंवा रात्रभर झोपतच नसाल तर तुम्हाला दिवसा झोप येणे सहाजिक आहे. परंतु, काही लोक थकवा किंवा सवयीमुळे दुपारी झोप घेतात. अनेकदा घरा सांभाळणाऱ्या महिला घरातील काम संपवल्यावर दुपारी थोडावेळ झोपणे पसंत करतात. परंतु, दुपारी किती वेळ झोप घेणे फायदेशीर असते हे तुम्हाला माहीत आहे का? दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? अभ्यासक राजीव धांड आणि हरज्योत सोहलद्वारे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, दिवसा केवळ 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेणेच फायदेशीर ठरू शकते.

    दिल्ली : जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागे रहात असाल किंवा रात्रभर झोपतच नसाल तर तुम्हाला दिवसा झोप येणे सहाजिक आहे. परंतु, काही लोक थकवा किंवा सवयीमुळे दुपारी झोप घेतात. अनेकदा घरा सांभाळणाऱ्या महिला घरातील काम संपवल्यावर दुपारी थोडावेळ झोपणे पसंत करतात. परंतु, दुपारी किती वेळ झोप घेणे फायदेशीर असते हे तुम्हाला माहीत आहे का? दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? अभ्यासक राजीव धांड आणि हरज्योत सोहलद्वारे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, दिवसा केवळ 30 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेणेच फायदेशीर ठरू शकते.

    यापेक्षा जास्त वेळ दुपारी झोपल्याने तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते. त्यासोबतच एक्सपर्टचा सल्ला आहे की, तुम्ही दुपारी 3 वाजतानंतर अजिबात झोपू नये. याने तुम्हाला रात्री झोपण्यास समस्या येऊ शकते. सोबतच दुपारी पावर नॅप घेताना तुमच्या आजूबाजूला अंधार आणि शांत वातावरण असावे. दुपारी झोपण्याला इंग्रजीत नॅपिंग असे म्हणतात.

    तुम्ही पावर नॅपबाबत नक्कीच ऐकले असेल. याचा अर्थ होतो दिवसा काही वेळ झोप घेणे. दुपारी थोडा वेळ झोप घेतल्याने आराम मिळतो, मूड चांगला म्हणजेच फ्रेश होतो, प्रतिक्रिया देण्याची क्षमता वाढते, स्मरणशक्तीत वाढ होते, सतर्कता वाढते, थकवा दूर होतो.

    हे सुद्धा वाचा