ड्रायफ्रूट्स खा निरोगी रहा; जाणून घ्या ड्रायफ्रूट्स खाण्याचे फायदे

मेव्यामध्ये खूप जास्त प्रोटिन असतात. त्यामुळे किडनी रोग, उच्च रक्तदाब,वाढलेले कोलेस्टेरॉल रुग्णांना पचनासंबंधित आजारांवर ङॉक्टर मेवा खाण्याचा सल्ला देतात.

  हल्लीच्या धावपळीच्या काळात बहुतेकदा आपण स्वतःची काळजी योग्य प्रकारे घेऊ शकत नाही. लाइफस्टाइलच्या नादात आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याकडे विशेषतः लक्ष राहत नाही. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.

  ड्रायफ्रूट खाल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होऊ शकतात. जाणून घेऊया ड्रायफ्रूट्स खाण्याचे फायदे.

  असे म्हणतात की, सुका मेवा खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, यासाठी त्याचे पदार्थ खाण्यापेक्षा ते असेच खाल्लेले जास्त चांगले असते. याच्या सालींवर दूषित कण असतात. यासाठी ते भिजून खाणे, आरोग्यदायी ठरते.

  मेव्यामध्ये खूप जास्त प्रोटिन असतात. त्यामुळे किडनी रोग, उच्च रक्तदाब,वाढलेले कोलेस्टेरॉल रुग्णांना पचनासंबंधित आजारांवर ङॉक्टर मेवा खाण्याचा सल्ला देतात.

  बदाम: बदामामध्ये कॅल्शियम, विटॅमिन ई, विटॅमिन बी आणि भरपूर प्रमाणात  फायबर असतात. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यासाठी दिवसांतून 5 बदाम आवर्जून खावेत.

  काजू: काजू सर्वांच्या घरात उपलब्ध असतात. तर काजू ला ङ्रायफुटचा राजा असेही म्हणतात. काजूमध्ये प्रोटिन, आयरन, फायबर आणि मॅग्नेशियमचा स्रोत मानतात. तसेच काजू आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात व आपले आजारांपासून संरक्षण करतात.

  सुके अंजीर: आपले वजन घटविण्यासाठी अंजीर खूप मोलाची मदत करते. कारण अंजीर खाल्ल्याने आपली भूक नियंत्रणात राहते. मात्र अंजीरचे जास्त सेवन हृदयासाठी घातक असते. कारण अंजीर खूप गरम असते. यासाठी कमीत कमी अंजीर खावे.