द्राक्ष खा मस्त राहा…पाहा काय आहेत फायदे ?

चवीला अतिशय रूचकर लागणारे, लहान आणि मोठेही हौसेने खातात ते फळ म्हणजे द्राक्ष ! द्राक्ष खाल्याने अनेक आजारांना आपण पळवून लावू शकतो. तसेच अनेक प्रकरांचे आजार होण्यापासूनही द्राक्षातील घटक आपल्याला मदत

चवीला अतिशय रूचकर लागणारे, लहान आणि मोठेही हौसेने खातात ते फळ म्हणजे द्राक्ष ! द्राक्ष खाल्याने अनेक आजारांना आपण पळवून लावू शकतो. तसेच अनेक प्रकरांचे आजार होण्यापासूनही द्राक्षातील घटक आपल्याला मदत करतात. द्राक्षांमध्ये प्रोटीन, पोट्यशिअम, फॉस्फोरस, कार्बोहायर्डेट, ग्लुकोजचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्यांना द्राक्ष खाल्याने याचा खूप फायदा होतो. तसेच थकवा जाणवत असेल तर द्राक्ष खाण्याने थकवाही पळून जाऊन ताजेतवाने वाटते.

आपल्या शरीरातील काही अनावश्यक द्रव्य शरीरातून बाहेर काढण्यासाठी द्राक्षातील साखर खूप उपयुक्त ठरते. रक्तातील क्षारांचे संतुलन राखण्यासाठीही द्राक्ष खाणे अतिशय उत्तम असते. शरीरातील आम्ल वाढल्यासही द्राक्ष खाल्ल्याने ते कमी होते. रोज द्राक्ष खाल्याने अपेडिंक्स, भोवळ येणे, रक्ताचे काही विकार, आणि थकवा हे विकार होणे टाळता येऊ शकतात. वृद्धावस्थेत वाढणाऱ्या तणावाव लाभकारी मानसिक तणावाखाली असलेल्यांनी तर द्राक्षाचे सेवन करावेच यामुळे त्यांना तणावातून मुक्तता मिळू शकते. पचन सुधारण्यासही द्राक्ष लाभकारी ठरतात.