दररोज सकाळी खा फक्त १ बदाम; मिळतील जबरदस्त फायदे

यासोबतच बदामांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, बर्याच लोकांना हे पुरेसे मिळत नाही. पण मॅग्नेशियमचे सेवन मेटाबॉलिक सिंड्रोम आणि टाइप 2 मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते.

    सहसा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बदाम खाल्ली जाते, परंतु या पलीकडे देखील रोज बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत (benefits of almond).

    बदाम चांगले फॅट, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्याने हे पौष्टिक असतात. मुठभर बदाममध्ये १६१ कॅलरीज आणि २.५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. पण हे लक्षात घेतले पाहिजे की आपले शरीर सर्वच गोष्टी पचवू शकत नाही त्यामुळे ह्यातील १०-१५% कॅलरीज आपले शरीर स्विकारत नाही.

    बदामांमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. हे आपल्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानामुळे होणाऱ्या वृद्धत्व किंवा कॅन्सर सारख्या रोगाचा धोका कमी करण्यात मदत करतात.

    बदाम हे व्हिटॅमिन ईचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात. व्हिटॅमिन ई मुळे हृदय रोग, कर्करोग आणि अल्झायमर सारखे आजार कमी करण्यास मदत होते.

    यासोबतच बदामांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, बर्याच लोकांना हे पुरेसे मिळत नाही. पण मॅग्नेशियमचे सेवन मेटाबॉलिक सिंड्रोम आणि टाइप 2 मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. शिवाय मॅग्नेशियमची कमतरता उच्च रक्तदाबाचे कारण होऊ शकते. त्यामुळे बदामाचे सेवन रक्तदाब नियंत्रित करण्यातदेखील मदत करू शकतात.

    दररोज बदाम खाल्ल्यास वाईट एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते आणि संभाव्यतः हृदयरोगाचा धोका कमी होतो.

    बदामात कार्बचे प्रमाण कमी असले तरी त्यामध्ये प्रोटिन्स आणि फायबर जास्त असतात. अभ्यास असे दर्शवितो की बदाम खाल्याने पोट भरल्याची भावना वाढते आणि कमी कॅलरी खाण्यास मदत होते.

    जरी बदामांमध्ये कॅलरीज जास्त असल्या तरी ते खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होत नाही. उलट काही अभ्यास असे सुचवतात की बदाम वजन कमी करू शकतात.