स्टॉबेरी खा, हृदयविकारापासून दूर राहा

पोटॅशियम हे द्रव्य स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक असल्याने हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करते.

  लाल रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीची तिच्या मोहक सुगंध आणि चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून ओळख आहे. ज्यांनी एकदा हे फळ खावून पाहिले आहे त्यांच्या समोर स्ट्रॉबेरीचे नाव काढताच त्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहाणार नाही. अगदी अपवादात्मक काही लोकांना कदाचीत हे रसाळ फळ आवडत देखील नसेल. स्ट्रॉबेरीचा अनेक खाद्य पदार्थांमध्ये उपयोग केला जातो. वेगवेगळ्या आइसक्रीम, मिल्क शेक, चॉकलेट आणि जाम बणवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर होतो. स्ट्रॉबेरी केवळ चवीला चांगली म्हणून खायची नाही तर, ते आरोग्यासाठी फायदे आहेत.

  – स्ट्रॉबेरी सेवनामुळे हृदयविकार आणि मधुमेहावर मात करता येते.
  – स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्याप्रमाणात असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा कमी होतो.
  – स्ट्रॉबेरी ऑक्साइड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठीदेखील लाभकारक आहे. स्ट्रॉबेरीमुळे मोतीबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरीतील ‘क’ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांना प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो.
  – स्ट्रॉबेरीत असणारे अँटिऑक्सिडंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्त्वे कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.
  – यातील ‘क’ जीवनसतत्व त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.

  – पोटॅशियम हे द्रव्य स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक असल्याने हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत करते.
  तांबड्या रक्तपेशींच्या अभावाने महिलांमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण आपल्याकडे मोठे आहे. स्ट्रॉबेरीमधील फोलेट हे तत्त्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.
  – सायट्रिक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीमध्ये असल्याने दात चमकदार होतात आणि हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.
  – सांधेदुखीपासूनदेखील स्ट्रॉबेरी दिलासा देते. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात.
  – स्ट्रॉबेरीमधील पोटॅशियम उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते.
  – मँगेनीज हे खनिज द्रव्यही स्ट्रॉबेरीत असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो आणि हाडेदुखीपासून दिलासा मिळतो.
  – स्ट्रॉबेरी मेदरहित असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.
  – जर असे फायदे स्ट्रॉबेरी खाण्यामुळे होणार असतील तर, हे आरोग्यदायी फळ नक्की खावे.