फसलेल्या संशोधनातून लागला व्हायग्राचा शोध; असा घडला हा सुखद अपघात!

पुरुषांच्या शीघ्रपतनाच्या समस्येवर तेव्हा खात्रीशीर आणि परिणामकारक औषध बाजारात उपलब्ध नव्हते. पुढच्या काही महिन्यात फायझर कंपनीने ती गोळी बाजारात आणण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून आवश्यक परवाने मिळवले.

    व्हायग्रा. ही गोळी कशासाठी वापरतात ते तुम्हाला माहीतच असेल. हृदयरोगावरील औषध बनविण्याच्या फसलेल्या प्रयोगातून अपघाताने व्हायग्राचा शोध लागला. वैद्यकीय क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी असणाऱ्या फायझर कंपनीत उच्च रक्तदाबाच्या समस्येसंबंधित संशोधन सुरू होते. संशोधनाचा भाग म्हणून एक प्रकारची गोळी बनवून एका स्वयंसेवकाच्या गटाला देण्यात आली.

    उच्च रक्तदाब आटोक्यात आणण्यासाठी तर त्या गोळीचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही पण संशोधनात भाग घेणाऱ्या पुरुष स्वयंसेवकानी त्या गोळीचा एक वेगळाच फायदा अनुभवला. हृदयातून शरीराला होणारा रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी बनविण्यात आलेली गोळी पुरुष स्वयंसेवकाना प्रत्यक्षात त्यांच्या लिंगाचा रक्तपुरवठा सुरळीत करण्यास मदत करत होती आणि त्यामुळे त्यांचे सेक्स लाईफ सुधारण्यास खूप मदत होत होती.

    अपघाताने का होईना फायझर कंपनीला एक सुवर्णसंधी लाभली होती. पुरुषांच्या शीघ्रपतनाच्या समस्येवर तेव्हा खात्रीशीर आणि परिणामकारक औषध बाजारात उपलब्ध नव्हते. पुढच्या काही महिन्यात फायझर कंपनीने ती गोळी बाजारात आणण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून आवश्यक परवाने मिळवले.

    व्हायग्रा गोळी बाजारात आणल्यानंतर अवघ्या काही दिवसांत लोकप्रिय झाली आणि विक्रीचे नवनवीन विक्रम बनवू लागली. तसेच फायझर कंपनीने कल्पकतेने जाहिरात करून व्हायग्रा गोळी प्रसिद्ध होईल ह्याची दक्षता घेतली. व्हायग्राचा अपघाती शोध अनेक जणांच्या आयुष्यात पुढे उद्भवणारे अपघात थांबविण्यास उपयोगी ठरला असेच म्हणावे लागेल.