क्या आपकी टुथपेस्ट में ‘यह’ है? असेल तर आत्ताच सावध व्हा..

एका निष्कर्षानुसार सध्या असलेल्या मर्यादेपेक्षा ५०० पट कमी ट्रायक्लोसन वापरले तरी ते मज्जासंस्थेसाठी घातक ठरू शकते. मुळात ट्रायक्लोसन हा एक अँटि बॅक्टेरियल पदार्थ आहे. याचा परिणाम माणसांच्या मज्जासंस्थेवर होतो. हा केमिकल पदार्थ भांडी आणि कपडे धुण्याच्या साबणात आढळतो.

टुथपेस्ट, साबण आणि रोजच्या वापरातील इतर उत्पादनं आपण वर्षानुवर्ष वापरत असतो. मात्र या उत्पादनांमध्ये एक घातक पदार्थ असल्याचं नुकतंच समोर आलंय. हा घातक पदार्थ तुमच्या टुथपेस्ट किंवा साबणात असेल, तर तो तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

या पदार्थाचं नाव आहे ट्रायक्लोसन. भारतीय औद्योगिक संस्था हैदराबादच्या संशोधकांनी ही बाब समोर आणलीय. या संस्थेनं केलेल्या रिसर्चमधून सापडलेले काही निष्कर्ष नुकतेच युनायटेड किंगडममध्ये प्रकाशित करण्यात आले.

यातील निष्कर्षानुसार सध्या असलेल्या मर्यादेपेक्षा ५०० पट कमी ट्रायक्लोसन वापरले तरी ते मज्जासंस्थेसाठी घातक ठरू शकते. मुळात ट्रायक्लोसन हा एक अँटि बॅक्टेरियल पदार्थ आहे. याचा परिणाम माणसांच्या मज्जासंस्थेवर होतो. हा केमिकल पदार्थ भांडी आणि कपडे धुण्याच्या साबणात आढळतो.

१९६० च्या दशकात केवळ औषधे बनवण्यापुरता याचा उपयोग केला जायचा. मात्र त्यानंतर इतरही अनेक गोष्टींसाठी ट्रायक्लोसनचा वापर होऊ लागला. ट्रायक्लोसनचे अतिप्रमाण आपल्या शरीरावर घातक परिणाम करू शकते, हे आता सिद्ध झाले आहे.

भारतात सध्या ट्रायक्लोसनच्या वापराच्या मर्यादेबाबत कुठलेही नियम नाहीत. या पदार्थाचे गरजेपुरते सेवन वैद्यकीय दृष्ट्या गरजेचे असले तरी त्याचे अतिसेवन मात्र विषारी ठरू शकते, असे आयआयटीतील तज्ज्ञ सांगतात. सध्या करण्यात आलेले संशोधन हे जेबफिशवर करण्यात आले होते. या माशाची रोगप्रतिकारक शक्ती ही जवळपास मानवाइतकीच असते. त्यामुळे या प्राण्याची निवड प्रयोगासाठी कऱण्यात आली होती.