सामना प्रेसबीओपियाचा

प्रोग्रेसिव्ह प्रकारातील लेन्स बायफोकल लेन्ससारख्याच असतात. पण दोन्हीमध्ये सुधारणा किंवा उपचारांच्या दरम्यान होणाऱ्या बदलांसाठी उपयुक्त असतात. त्यात मध्ये कोणती रेष नसते.

  प्रेसबायोपिया किंवा डोळ्यातील लेन्सचे नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होणे हे वाढत्या वयातील बदल आहे.  साधारणतः चाळीशीत किंवा चाळीशीनंतर प्रेसबायोपियाचा त्रास होताना दिसतो. मोबाईलवर नंबर टाईप करणे, पुस्तक वाचणे यामध्ये अडचणी येऊ लागतात तेव्हा या त्रासाकडे लक्ष जाते. ज्या लोकांना जवळच्या गोष्टी बघण्याची वेळ रोजच येते त्यांना या गोष्टी लवकर लक्षात येतात आणि ते तक्रार करतात.

  हल्ली मोबाईल, लॅपटॉप याचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याने लोकांना लवकर चष्मा लागतो. दृष्टीवैषम्य, निकटदृष्टीदोष, दूरदृष्टी दोष हे प्रेसबायोपियामधले विविध प्रकार आहेत. डोळ्यांतील बाहुलीच्या आकाराशी यांचा संबंध असतो. तसेच अनुवांशिक आणि पर्यावरणीय कारणे देखील आहेत.
  प्रेसबायोपियाच्या त्रासात सुधारणा करण्याची योग्य पद्धत आपल्या जीवनशैलीवर आणि डोळ्यांवर अवलंबून आहे. आपल्या नेत्ररोग विशेषतज्ञांशी जीवनशैलीविषयी चर्चा करा. जेणेकरून जीवनशैलीतील केणते बदल उपयुक्त ठरू शकतात ते कळू शकते.

  बायफोकल किंवा प्रोग्रेसिव्ह लेन्स असलेले चष्मे हे प्रेसबायोपियामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वसाधारणपणे वापरले जातात. बायफोकल म्हणजे दोन लेन्स असतात. चष्माच्या लेन्सचा प्रमुख भाग लांबच्या दृष्टीतील सुधारणेसाठी असतो. तर खालचा भाग हा जवळच्या गोष्टी पाहण्यासाठी असतो.

  प्रोग्रेसिव्ह प्रकारातील लेन्स बायफोकल लेन्ससारख्याच असतात. पण दोन्हीमध्ये सुधारणा किंवा उपचारांच्या दरम्यान होणाऱ्या बदलांसाठी उपयुक्त असतात. त्यात मध्ये कोणती रेष नसते. प्रेसबायोपियाचा उपचार करण्यासाठी कंडक्टिव कैरेटोप्लास्टी किंवा कॉर्नियल इन लेज सारख्या शस्त्रक्रियांचा पर्यायही उपलब्ध आहे. त्याशिवाय लेसरचा वापर मोनोविजन तयार करण्यासाठी करता येऊ शकतो. त्या एका डोळ्याची जवळच्या दृष्टीतील दोष दूर करता येतात.

  तर दुसऱ्या डोळ्याची दूरदृष्टी मजबूत करता येते. रिफ्रक्टिव्ह लेन्स एक्सचेंज ही एक प्रभावशाली उपचार पद्धती आहे. त्यामुळे दृष्टी स्पष्ट होते. पण नैसर्गिक लेन्सबरोबर एक कृत्रिम लेन्स असते. ती बहुकेंद्रीत दृष्टीसाठी असते. ज्यांना मोतीबिंदू नाही पण सर्व प्रकारचे दूरदृष्टीचे दोष आहेत त्यांच्यासाठी ही उपयोगी ठरते.