जाणून घ्या कोणती गुणसूत्रे जुळल्यानंतर ठरते मुलगा होणार की मुलगी?

मुलगा किंवा मुलगी हवी असल्यास ठराविक दिवसातंच, काळातंच काम क्रीडा करावी किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचं डायट करावं जेणेकरून आपल्याला हवं ते अपत्य आपण...

    लिंग निदान चाचणी हा आपल्या देशात कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी शरीर संबंध झाल्यानंतर मुलगा होणार की मुलगी हे कसे ठरत असेल याची अनेकांना माहिती नाही.

    याबाबतीत विज्ञान काय म्हणतं हे जर पाहिलं तर असं लक्षात येतं की, माणसाच्या शरीरात २४ प्रकारचे गुणसूत्र असतात. आणि ती स्त्री आणि पुरुष या दोघांकडेही असतात. स्त्रियांमध्ये २२ गुणसूत्र असतात आणि एक लिं ग गुणसुत्र (XX) असतं. तर पुरुषांकडे २२ गुणसुत्र आणि एक लिं ग गुणसुत्र (XY) असतं.

    तसेच अंड पेशीमध्ये २२‌+X गुणसूत्रे असतात. म्हणून अंडपेशीला ‘सम युग्मकी’ म्हणतात. तर शुक्र पेशीमध्ये २२‌+X किंवा २२‌+Y अशी गुणसूत्रे असतात आणि त्यांचे प्रमाण ५०:५० टक्के असते. म्हणून शुक्रपेशींना ‘विषम युग्मकी’ म्हणतात. फलनाच्या वेळी २२‌+X गुणसूत्रे असलेल्या शुक्रपेशीचे फलन अंड पेशीबरोबर झाल्यास फलित अंडपेशीमध्ये ४४+XX अशी गुणसूत्रांची संख्या होते व त्यापासून स्त्री भ्रूण तयार होतो.

    जर फलनाच्या वेळी २२‌+Y गुणसूत्रे असलेल्या शुक्रपेशीचे आणि अंडपेशीचे फलन झाल्यास फलित अंडपेशीमध्ये ४४+XY अशी गुणसूत्रे होतात व पुरुष भ्रूण तयार होतो. निसर्गत: पुरुष आणि स्त्रियांची संख्या ५०% असावी. यासाठी शुक्र पेशी विषम युग्मकी असतात. लिंग निश्चिती ही यादृ च्छ‍िक (रँडम) पद्धतीने पुरुषाकडून आलेल्या शुक्र पेशीमुळे होते.

    स्त्री पुरुष समागम नंतर जर एक्स एक्स (XX) गुणसूत्र मिळाली, तर मुलगी जन्माला येते. आणि एक्स वाय (XY) ही गुणसूत्र मिळाली तर मुलगा जन्माला येतो. म्हणजे, मुलगा किंवा मुलगी जन्माला येणे हे पुरुषावर अवलंबून आहे. भ्रूणाची लिंग निश्चिती ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने स्त्री अर्भक जन्माला आल्यास स्त्रीला जबाबदार धरणे योग्य नाही, याशिवाय मुलगा किंवा मुलगी हवी असल्यास ठराविक दिवसातंच, काळातंच काम क्रीडा करावी किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचं डायट करावं जेणेकरून आपल्याला हवं ते अपत्य आपण जन्माला घालू शकू, पण अशा प्रकारच्या गोष्टीना कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही.