या कारणांमुळे मासिक पाळी होते अनियमित; अनेकांना हे माहितीच नाही

...हे एकच कारण नसून आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल घडून येत असतात. संप्रेरकांच्या बदलांमुळे किंवा काही किरकोळ आजारांमुळे हे घडत असते. तर मासिक पाळी वेळच्या वेळी

  मासिक पाळी (menstruation) येणं ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली एक अमूल्य अभिव्यक्ती आहे आणि ती मानली सुद्धा पाहिजे. प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला मासिक पाळी (Periods)येते. हे जणू एक चक्रच आहे. हे वयाच्या १२ ते १३ व्या वर्षापासून सुरू होत असते. काही वेळा मासिक पाळी उशिरा येत असते,(irregular) याचे कारण फक्त गर्भ धारणाच मानले जाते.

  पण हे एकच कारण नसून आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे बदल घडून येत असतात. संप्रेरकांच्या बदलांमुळे किंवा काही किरकोळ आजारांमुळे हे घडत असते. तर मासिक पाळी वेळच्या वेळी होणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर उशिरा होत असेल तर त्याला कारणे कोणकोणती आहेत हे आपण जाणून घेऊया.

  अधिक परिश्रम- हल्लीच्या काळात मुली आणि महिला यांना जाडेपन आवडत नसते. यासाठी ते डायट करत असतात. वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात व्यायाम करत असतात. याचा परिणाम मासिक पाळीवर होत असतो. आपले हा र्मो न बदलत असल्यामुळे मासिक पाळीत बदल होत असतात.

  वजन कमी होणे- जर आपले वजन कमी होणे किंवा एकदमच वाढणे याचा परिणाम मासिक पाळी वर होत असतो. काही स्त्रीयांचे वजन हे वाढतच असते. त्यांच्यात इन्स्ट्रोजन संप्रेरक असतो. त्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन मासिक पाळी अनियमित होत असते.

  थायरॉइड- थायरॉईड असणे हा आ जा रच झाला आहे. हे केवळ स्त्रियांच्यात पाहायला मिळते. हार्मोन्स हे संतुलित असले पाहिजे. जर ते असंतुलित असतील तर मासिक पाळी थांबते. आणि मासिक पाळीची तारीख ही बदलत असते. गळ्यातील थायरॉईड ग्रंथी मेटाबॉलिज्म नियंत्रित करते. शरीराच्या बर्‍याच कार्यामध्येही याची भूमिका असते. आपल्याला थायरॉईडसंबंधित कोणतीही समस्या असल्यास ते मासिक पाळी देखील प्रभावित करते.

  एंटिबायोटिक गोळ्या- जास्त क्षमतेच्या किंवा सततच्या आजारांमुळे घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांचा परिणाम मासिक पाळी वर होत असतो. याऔषधांचा वापर केल्यास मासिक पाळी थांबवली जाऊ शकते. जन्म नियंत्रण गोळ्या आणि काही इतर औषधे देखील मासिक पाळीचे चक्र बिघडवितात.

  पूर्व रजोनिवृत्ती- स्त्रियांच्या जी वनातील मासिक पाळी बंद होतो तो काळ पूर्व रजोनिवृत्ती. तो काळ जसा जवळ येतो तेव्हा मासिक पाळी अनियमित होते.

  स्तनपान- अनेक स्त्रिया स्त नपान देतात त्यामुळे वेळेवर मासिक पाळी सुरू होत नाही.

  नित्यक्रमात बदल- वेळापत्रक बदलणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, शहरातून बाहेर पडणे किंवा ल ग्नाच्या वेळी किंवा घरात एखाद्या कार्यक्रमामुळे आपली दिनचर्या बदलते. तेव्हा असे होते पण जेव्हा शरीराला या नवीन जबाबदाऱ्यांची सवय लागते किंवा जेव्हा आपण सामान्य जीवनशैलीत परत येतो तेव्हा मासिक पाळी देखील नियमित हते .

  धुम्रपान अथवा मद्य पान- महिला असो वा पुरूष मद्य पान आणि धुम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे. मात्र हे माहीत असूनही अनेकजण व्यसनांच्या आहारी जातात. महिलांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. धुम्रपान आणि मद्यपानाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होत असतो. व्यसनांच्या अधीन गेल्यामुळे महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो.