वारंवार येणारे चक्‍कर देतात धोक्याचा इशारा

0 ग्रॅम धणे पावडर किंवा आवळ्याची पावडर  रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून ते पाणी सकाळी उठल्यानंतर प्यायल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

  सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. मात्र, सततच्या कामाच्या व्यापामध्ये आपण अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करतो. अलीकडील काळात अनेकांमध्ये आढळणारी, पण दुर्लक्ष केली जाणारी समस्या म्हणजे चक्‍कर येणे. बैठी जीवनशैली असणार्‍या तरुणपिढीमध्येही ही समस्या जाणवते.

  काही वेळा एका जागी बसून राहिले की, उठताना एकदम गरगरायला होते. डोळ्यांसमोर अंधारी येते. अशा वेळी काय करावे ते सुचत नाही. अनेकदा मेंदूमध्ये रक्‍तपुरवठा कमी झाल्याने चक्‍कर येऊ शकते. एकदा-दोनदा जर अशा प्रकारचा त्रास झाला असेल, तर काही घरगुती उपाय करता येतात.- तुळशीच्या पानांचा रस तयार करून त्यामध्ये काही प्रमाणात साखर घालून तो रस घ्यावा. तसेच तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून घेतल्यास त्याचाही चांगला फायदा होतो.

  – 10 ग्रॅम धणे पावडर किंवा आवळ्याची पावडर  रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून ते पाणी सकाळी उठल्यानंतर प्यायल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

  – अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन लवंग टाकून ते पाणी उकळून पिणेही फायदेशीर आहे.

  – ज्यांना चक्‍करचा नेहमीचा त्रास आहे, अशा व्यक्‍तींनी दहा ग्रॅम आवळा, तीन ग्रॅम काळी मिरी आणि दहा ग्रॅम बत्तासे घेऊन त्याचे बारीक मिश्रण करून पंधरा दिवस नियमितपणे दुपारच्या जेवणापूर्वी दोन तास आधी घ्यावे. त्याबरोबरच संध्याकाळच्या वेळी फळांचा रस घ्यावा किंवा ताजी फळे खावीत.

  – चक्‍कर येण्याचा त्रास असणार्‍यांनी चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी ठेवावे.

  – या समस्येवर नारळाच्या पाण्याचाही चांगला फायदा होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  – मनुके तुपामध्ये भिजवून त्याला मीठ लावून खाण्यानेही चक्‍कर येण्याचे प्रमाण कमी होते.

  अर्थातच, हे घरगुती उपाय आहेत. हे उपाय करूनही जर चक्‍कर येतच असेल तर वेळ न दवडता तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक ठरते.