दुर्धर आजारामध्ये फायदेशीर आहे लसणाचे तेल; मधुमेह असणाऱ्यांनी नक्की वाचा

लसणाचे तेल त्वचेवर तीन वेळा चोळल्यास ट्युमरचे निदान सहज होते. तसेच त्यातून होणार्‍या इंफेक्शनचे निदान करणे सुकर होते.

  लसणाच्या उग्र वासामुळे तुम्ही त्याचा आहारातील वापर टाळत असलात तरीही लसणाचे तेल अनेक समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरत असल्याने मेडीसीन कीटमध्ये नक्की लसणाचे तेल ठेवा. कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामध्ये लसणाचे तेल वापरले जाते.

  –  तुमच्या वजनाच्या प्रति किलो तुलनेत 100 मिलीग्रॅम लसणाचे तेल दर दिवसा आड तीन आठवडे घेतल्यास इन्सुलिनच्या कार्याला चालना मिळते.

  – आहारामध्ये लसणाच्या तेलाचा वापर केल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. सोबतच हृद्यविकार आटोक्यात राहतात.

  – लसणाच्या तेलामध्ये बुडवलेला कापसाचा गोळा पायाच्या नखांवर ठेवल्याने नैसर्गिकरित्या फंगल इंफेक्शन कमी होण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टीफंगल गुणधर्म फंगसची वाढ रोखतात आणि त्यावर नैसर्गिकरित्या प्रतिबंध करतात.

  – टोबॅकोमधील निकोटीन घटक अनेक प्रकारे शरीराचे नुकसान करू शकते. त्याचा परिणाम कमी करण्यासाठी लसणाचे तेल फायदेशीर ठरते. त्यामधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक निकोटीनचा त्रास कमी करतात.

  – लसणाचे तेल त्वचेवर तीन वेळा चोळल्यास ट्युमरचे निदान सहज होते. तसेच त्यातून होणार्‍या इंफेक्शनचे निदान करणे सुकर होते.

  – किडनी विकार आणि मधूमेहातून वाढणार्‍या समस्या आटोक्यात राहतात – एका संशोधनाच्या अहवालानुसार, आहारात लसणाच्या तेलाचा वापर 15 दिवस केल्यास यकृत आणि किडनीच्या कार्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. तसेच मधूमेहातून वाढणार्‍या गुंतागुंतीच्या समस्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

  – लसणामधील दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल क्षमता कानातील मळ साफ करण्यास मदत करते. त्यामुळे खोकल्यामुळे होणारी कानदुखी कमी होते. यासाठी लसणाचे तेल थोडे गरम करून कानात घालावे.