ग्रीन ॲपल आहे मधुमेहींसाठी लाभदायक; जाणून घ्या फायदे

लाल चुटूक आणि ज्युसी सफरचंद  बाजारात सहज उपलब्ध आहेत. मात्र त्याचसोबत हिरवट सफरचंददेखील आजकाल सर्रास दिसतात. प्रामुख्याने मधूमेहींना हिरवी सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो.

  या उक्तीप्रमाणे आरोग्यदायी राहण्यासाठी सफरचंदाचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते. लाल चुटूक आणि ज्युसी सफरचंद  बाजारात सहज उपलब्ध आहेत. मात्र त्याचसोबत हिरवट सफरचंददेखील आजकाल सर्रास दिसतात. प्रामुख्याने मधूमेहींना हिरवी सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. पण सफरचंदामधील रंगांचा फरक त्यामधील आरोग्यदायी गुणधर्मांमध्येही बदल करतात का ?

  – हिरव्या सफरचंदामध्ये कमीत कमी साखर आणि अधिक प्रमाणात फायबर घटक आढळतात. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर किंवा सफरचंदासारखे गोडसर फळ खाल्ल्यानंतर लगेचच रक्तातील साखर वाढू शकते हा धोका कमी करण्यासाठी हिरवी सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे प्रामुख्याने टाईप 2 डाएबेटीक्सच्या रुग्णांमध्ये हिरवी सफरचंद खाण्याचा फायदा होतो.

  –  हिरव्या सफरचंदामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक आणि सोबतच व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.

  – हिरव्या सफरचंदामध्ये 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे त्यातील साखरेमुळे शरीराला आवश्यक उर्जादेखील मिळते. हिरव्या सफरचंदाची GI पातळी 39 आहे. म्हणजेच हिरवी सफरचंद एक लो ग्लासमिक पदार्थाचा पर्याय आहे.

  – दुपारच्या जेवणानंतर एक हिरवे सफरचंद नक्की खावे. मात्र त्याची साल काढू नका. सालीमध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात.

  – प्रामुख्याने त्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. मात्र मधूमेहींनी किती प्रमाणात सफरचंद खावे यावर काही मर्यादा आहेत. त्याच्या नियमित कॅलरीजच्या आवश्यकतेनुसार त्यांनी किती तुकडे सफरचंद खावे हे ठरते. त्यामुळे मधूमेहाच्या रुग्णांनी त्यानुसार आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

  – एकाचवेळी मोठे किंवा भरपूर सफरचंद खाल्ल्यास रक्तातील साखर पटकन वाढू शकते. म्हणूनच मध्यम आकाराचे सफरचंद  निवडावे. तसेच सफरचंद पीनट बटर, कॅरॅमल किंवा चॉकलेट सॉसमध्ये बुडवून खाणे टाळा.

  – हिरव्या सफरचंदाप्रमाणेच बेरीज सारख्या लो ग्लासमिक इंडेक्स असणार्‍या फळांचा स्मुदीमध्ये समावेश करून आस्वाद घेणेदेखील फायदेशीर ठरते.