उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे?; जाणून घ्या त्याचे गंभीर परिणाम

उभे राहुन पाणी पिल्याने हृदयात जळजळ आणि अल्सर सारखे आजार होऊ शकतात. यावेळी अन्ननलिकेच्या खालच्या भागात वाईट परिणाम पडू शकतो. ज्याकारणाने छाती आणि हृदयात जळजळ होते आणि...

    उभं राहून पाणी पिल्यास जुने लोकं हमखास टोकतात. अगदी ते अशिक्षित असले तरीही.  उभं राहून पाणी पिणे ( habit of standing up and drinking water) आरोग्यासाठी कायम धोकादायक असतं (serious consequences). आजच्या धावपळीच्या जीवनात आपण १२ ते १५ तास घराबाहेर असतो. अशावेळी पाणी कुठे बसून प्यायचे हा प्रश्न असतो? त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते आणि ती शरीरासाठी घातक असते.

    आपल्या शरीरातील पाण्याला फिल्टर करण्याचे काम किडनीचे असते. उभे राहून पाणी पिल्याने पाणी किडनीमधून योग्य रीतीने फिल्टर न होता वाहून जाते. वेळेसोबतच तुमच्या मूत्राशय आणि रक्तामध्ये घाण जमू लागते. जर हीच स्थिती जास्ती काळापर्यंत राहिली तर मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात. उभ्याने पाणी प्यायल्यावर ते थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते.

    उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्नायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.

    उभे राहुन पाणी पिल्याने हृदयात जळजळ आणि अल्सर सारखे आजार होऊ शकतात. यावेळी अन्ननलिकेच्या खालच्या भागात वाईट परिणाम पडू शकतो. ज्याकारणाने छाती आणि हृदयात जळजळ होते आणि अल्सर सारख्या रोगांना निमंत्रण मिळते. जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल, तर तुम्हाला भविष्यात संधिवात सारखे भयंकर आजार जडू शकतात.

    कारण उभे राहून पाणी पिल्याने शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडते. पाणी सरळ तीव्र वेगाने खालच्या दिशेने जाते, जे सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांचे संतुलन बिघडवून तिथे गोठण्याची प्रक्रिया सुरु होते. ज्यामुळे सांधे दुखी आणि गाठ येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.