आलूबुखाराचे आरोग्यदायी फायदे

आलुबुखारमध्ये अँटिऑक्सिडंट्ससारखे ल्युटिन, कायप्टोएक्थिन आणि जिया एक्साथिन असते. जे फ्री रेडिकल्स दूर करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिस थांबवण्यासाठी आलुबुखार खूप मदतगार आहे. मेनोपॉझनंतर महिलांनी आलुबुखारचे सेवन केल्यास तो ओस्टियोपोरेसिससारख्या गंभीर समस्यांपासून बचाव करू शकताे.

  आलूबुखारामध्ये डायटरी फायबर्स असतात, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. आहारात या फळाचा समावेश अवश्य करा. यात अशी पोषक तत्त्वे आहेत, ज्यामुळे आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

  फायबर
  यात डायटरी फायबर्स असतात, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. यात असणारे सोल्युबल फायबर्स कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवते. याचे नियमितपणे सेवन केल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. यामुळे रक्ताच्या गाठी होणे थांबवते. ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयासंबंधी आजारांच्या शक्यता कमी होतात. याशिवाय अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी मदत करते.

  व्हिटॅमिन सी
  आलुबुखारमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ज्या लोकांना वारंवार सर्दी -पडसे होते, त्यांनी आलुबुखार नियमितपणे खावे. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि या त्रासाचा परिणाम कमी होतो. यामुळे डोळ्यांचा रेटिना मजबूत होण्यास मदत होते.

  अँटिऑक्सिडंट्स