turmeric kadha

घरीच(Homemade Kadha) उपलब्ध असलेल्या मसाल्याच्या पदार्थांपासून वेगवेगळे काढे बनवले जातात. आयुर्वेदात(Ayurveda ) विविध आजारांवर उपयुक्त ठरणाऱ्या काढयांची माहिती देण्यात आली आहे.

  पावसाला(Rain) सुरुवात झाली आहे. ऋतू बदलामुळे सर्दी (Cold), खोकला (Cough), घशात खवखव असे त्रास पावसाळ्यात हमखास सुरु होतात. सध्याच्या कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) हे आजारांचीही लोकांना भीती वाटत आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे साधा खोकला, सर्दी, तापदेखील लोकांची झोप उडवत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या कोविड-१९ आजारातही ताप, सर्दी, खोकला ही प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती अधिक वाढली आहे.

  कोरोना विषाणूची (Covid-19) लागण होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या विविध उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. यामध्ये आयुर्वेदिक काढे, औषधे, होमिओपॅथिक गोळ्या, अशा विविध प्रकारच्या उपायांचा समावेश आहे. एरव्ही सर्दी, खोकला, ताप अशा आजारांवर काढे घेण्याची पद्धत आपल्याकडे प्रचलित आहे.

  घरीच उपलब्ध असलेल्या मसाल्याच्या पदार्थांपासून  वेगवेगळे काढे बनवले जातात. आयुर्वेदात(Ayurveda ) विविध आजारांवर उपयुक्त ठरणाऱ्या काढयांची माहिती देण्यात आली आहे. आज आम्ही ज्या काढ्याची माहिती देणार आहोत त्याच्या नियमित सेवनामुळे रोग प्रतिकारशक्ती वेगानं वाढते आणि आजारांना दूर ठेवणं शक्य होतं.

  काढ्यासाठी लागणारे घटक – १ ग्लास पाणी,८ ते १० तुळशीची पाने (Basil Leaves), २ ते ३ लवंगा (Clove), दालचिनीच्या (Cinnamon)१ ते २ लहान काड्या, हळद (Turmeric) अर्धा चमचा आणि मध (Honey) २ चमचे

  काढा करण्याची कृती  – काढा तयार करण्यासाठी प्रथम तुळशीची पाने, दालचिनी, लवंगा आणि हळद बारीक वाटून घ्यावी. हे मिश्रण एका पॅनमध्ये चांगले गरम करावे. नंतर एका भांड्यात एक ग्लास पाणी (one glass water) उकळून घेऊन आणि त्यात ही पेस्ट घालावी. हे पाणी १५ ते २० मिनिटे चांगले उकळू द्यावं. नंतर गाळून घ्यावं. घेण्यापूर्वी त्यात चवीसाठी मध घालावा.

  घसा खवखवत असेल किंवा थंडी वाजून आल्यासारखं वाटत असेल तर दररोज दोन ते तीन वेळा हा काढा घ्यावा. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होईल. छातीत असलेला कफदेखील कमी होईल. घसा दुखत असल्यास हा काढा घेतल्यानं लगेच आराम पडतो.