girl wearing mask

आपण अनेक दिवसांपासून वापरत (Mask Cleaning) असलेला फेस मास्क घाण झाला असेल तर तो मास्क साबणाने आणि कोमट पाण्याने धुवू(Mask Washing) शकता. यानंतर मास्क उन्हात किमान ५ तास वाळत ठेवा. मास्क वाळल्यावर आपण तो वापरू शकता.

  कोरोनामुळे(Corona) मास्क(Mask) वापरणे बंधनकारक झाले आहे. मात्र वारंवार नवीन मास्क आणण्याऐवजी जुना मास्क स्वच्छ करुन वापरता येईल का ? असा प्रश्न अनेकांना पडतो.तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही देणार आहोत.

  कानपूरच्या चंद्रशेखर आझाद कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे होम सायंटिस्ट डॉ. आकांक्षा चौधरी यांनी कोरोना संक्रमणास प्रतिबंधासंदर्भातील प्रश्नांवर आणि उपायांवर सविस्तर माहिती दिली.

  मास्कची स्वच्छता(Mask Cleaning At Home)

  डॉ. आकांक्षा चौधरी म्हणाल्या आपण अनेक दिवसांपासून वापरत असलेला फेस मास्क घाण झाला असेल तर तो मास्क साबणाने आणि कोमट पाण्याने धुवू(Mask Washing) शकता. यानंतर मास्क उन्हात किमान ५ तास वाळत ठेवा. मास्क वाळल्यावर आपण तो वापरू शकता.

  त्यांनी सांगितले की, प्रेशर कुकरच्या मदतीने आपण पाण्यात मीठ मिसळा. गरम पाण्यात किंवा प्रेशर कुकरमध्ये मास्क सुमारे १५ मिनिटे उकळावा आणि नंतर तो कोरडा करा आणि मास्क साबणाने धुवा. मास्कस्वच्छ झाल्यावर आपण त्यावर इस्त्री किंवा प्रेस करून कोरडे करू शकता.

  डिस्पोजेबल मास्क अजिबात उकळू नये आणि तो स्वच्छ ही करू नये याचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. ते मास्क वापरल्यानंतर डस्टबिनमध्ये फेकून द्या. मास्क ऐवजी एक कापड, रुमाल,साफी तोंडावर गुंडाळू शकता.

  एन-९५ मास्क डॉक्टर वापरतात. आपण कापड किंवा रुमालचा वापर मास्क म्हणून करत असाल तर आपण कितीही वेळा ते वापरू शकता. परंतु ते मास्क स्वच्छ धुवून वापरा.उन्हात वाळवून किंवा त्यावर सॅनिटायझर टाकून मग ते वापरा.

  घराची स्वच्छता

  डॉ. आकांक्षा चौधरी यांनी सांगितले की घरातील स्वच्छता करण्यासाठी आपण आपले घर आणि सर्व वस्तू ब्लीचिंग पावडरने स्वच्छ करू शकता. घराची अशी जागा स्वच्छ करा ज्याला घरातील प्रत्येक जण पुन्हा पुन्हा स्पर्श करतो. जसे की दाराची हँडल्स, फर्निचर. साबणाने आपले हात स्वच्छ ठेवा. किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने देखील स्वच्छ करू शकता.

  भाज्यांची स्वच्छता

  भाज्या गरम पाण्याने धुवाव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यानंतर भाज्या चांगल्या प्रकारे शिजवून घ्या आणि खा. डॉक्टर आकांक्षा चौधरी म्हणाल्या की जर एखाद्याच्या हाताला सॅनिटायझरने त्रास होत असेल तर तज्ञांनी फक्त त्यांना साबण वापरण्याचा सल्ला दिला आहे. आपले हात साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवावे हे सर्वात योग्य आहे.