नव्या वर्षात करा प्लॅनिंग; रोजच्या कामातून ‘असा’ करा व्यायाम

जिम जाण्यास आपल्या पुरेसा वेळ मिळते नाही. परंतु, या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी पुढील उपाय महत्त्वपूर्ण ठरतील.

सध्याच्या या प्रेझेंटेबल जीवनामध्ये आपण निटनेटके राहण्याबरोबर आपल्या शरीराच्या फिटनेसकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण रोज कंप्युटरसमोर बसून काम करतो. रोजच्या या कामामुळे आपल्याला व्यायाम करण्यास किंवा जिम जाण्यास आपल्या पुरेसा वेळ मिळते नाही. परंतु, या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी पुढील उपाय महत्त्वपूर्ण ठरतील.

१) आपण दररोज थोडे तरी चालले पाहिजे. चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. एक मिनीटभर चाला आणि एका मिनीटापर्यंत धावा. याने आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.

२) तुम्ही जर रोज स्विमिंग करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी ते अतिउत्तम आहे. स्विमिंग केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. त्याने आपली सहनशीलता वाढते.

३) रोज थोड्यावेळ तरी सायकल चालवा. त्याने तुमच वजन नियंत्रणात राहील. सायकल चालवणे सगळ्यात उत्तम व्यायाम आहे.

४) रोज आपल्या आवडत्या गाण्यावर डांन्स करा. त्याने शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. डान्स केल्याने आपले मनही प्रसन्न राहते.

५) रोज काही वेळासाठी ध्यानसाधना करा. त्याने तुमच्या शरीरातील संतुलन साधता येईल. ध्यानसाधनेने वाढलेले वजन कमी करण्यास आणि कमी वजन वाढवण्यासही मदत होते.

६) सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले स्वत:ची काळजी घ्यायला शिका. आवडेल त्या गोष्टी प्रमाणात करा.स्वत:वर प्रेम करा. त्याने तुम्ही खूप प्रसन्न राहाल आणि नेहमी आनंदी राहाल.