weight loss

आपल्या आहारात आणि सवयींमध्ये आपण काही बदल केले तर वजन कमी करणे काही अवघड नाही. वजन (How To Loose Weight) कसे कमी करता येईल ते आपण आज जाणून घेऊयात.

    लॉकडाऊनमुळे अनेकांचं वजन वाढलं आहे. वजन काय केल्याने कमी होईल अशा विचारात अनेकजण आहेत. जर तुम्हाला वजन कमी(How To Loose Weight) करायचे असेल तर आहारात आणि आपल्या काही सवयींमध्ये(Weight Loss Tips) थोडासा बदल करावा लागेल. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात.

    जेवण

    रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि सौम्य, पचन करणे सोपे आणि कमी कॅलरी युक्त असावे. रात्रीच्या जेवणातील जड पदार्थ पचायला त्रास होऊ शकतो आणि आपल्या झोपेत अडथळा येऊ शकतो. रात्रीचे जेवण आपण लवकर केले पाहिजे. असे केल्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि लठ्ठपणादेखील वाढत नाही. रात्री झोपण्याच्या २ तास अगोदर आपण जेवण केले पाहिजे.

    पाणी

    पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्यास सांगितले जाते. पण, ज्या लोकांना वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशांनी जेवणाच्या अगोदर शक्य तितके जास्त पाणी प्यायला हवे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगले होते.

    चहाऐवजी कोमट पाणी प्या

    वजन कमी करायचे असेल तर चहा पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे. चहाऐवजी आपण कोमट पाणी प्यायलो तरी वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते. दररोज गरम पाण्याचे सेवन करा जेणेकरुन आपले वजनही नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी होईल. दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी गरम पाणी फायदेशीर आहे.

    पौष्टीक आणि कमी कॅलरी असलेला आहार

    आपल्या आहारात बेरी, द्राक्षे, सफरचंद, खरबूज, ब्रोकोली, फुलकोबी, सोयाबीन, गाजर, बीट्स इ. समाविष्ट करा. या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या पौष्टीक असतात आणि त्यामध्ये कॅलरीचे प्रमाणदेखील कमी असते. हे आपल्याला निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. गहू, सोया, बाजरी, ज्वारी, नाचणी, मुग आणि ब्राऊड राईसचा आहारात समावेश केला पाहिजे. या कडधान्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे याचा समावेश आपल्या आहारात केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरल्या सारखे वाटते.