sweating in summer

उन्हाळ्यात शरीरामधून खूप घाम(bad odour of sweating) येतो. काही उपायांद्वारे तुम्ही घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. हे उपाय कोणते आपण पाहूयात.

    उन्हाळ्यात शरीरामधून खूप घाम(bad odour of sweating) येतो.घामाच्या दुर्गंधीने आपण आणखी अस्वस्थ होतो. घामाच्या दुर्गंधीला घालवण्यासाठी केवळ डियो लावून काम होणार नाही. कारण अनेकदा त्यावर पुन्हा घाम आल्यावर अजूनच दुर्गंध पसरतो. मात्र काही उपायांद्वारे तुम्ही घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता. हे उपाय कोणते आपण पाहूयात.

    • बॅक्टेरियांचा नाश करु शकेल अशा साबणाने आंघोळ करा.
    • शरीराची व्यवस्थित स्वच्छता  करा.
    • दररोज पाय धुवा. जोडे-चपला आणि मोजे स्वच्छ करा त्यामुळे शरीराच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळू शकते.
    • आंघोळ केल्यानंतर शरीर पुसल्याशिवाय कपडे घालू नये. अशात लगेच घाम येत नाही.
    • आर्मपिट्स शेव किंवा वॅक्स करत राहावे कारण केसांमुळे अधिक घाम येतो.
      अधिक मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा आणि भरपूर पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.
    • कॉटनचे आरामदायक कपडे वापरा.
    • धूम्रपान केल्याने शरीराचं तापमान वाढते त्यामुळे धूम्रपान टाळा.
    • नैसर्गिक परफ्यूम वापरा.