teeth care

दातांची काळजी(how to take care of teeth) घेणे विषेश गरजेचे आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण दातांना नुकसान पोहोचवत असतो म्हणून या गोष्टी करणे टाळले तर दातांचे आरोग्य उत्तम राहू शकते.

  दातांची काळजी(teeth care) घेणे किती आवश्यक असते हे वेगळे सांगायला नको. पण अनेकदा आपण दातांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. दोन वेळा ब्रश(toothbrush) केले की काम झाले. दातांच्या आरोग्याचा विषय आपल्यासाठी इथेच संपतो. पण दातांची काळजी घेणे विषेश गरजेचे आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण दातांना नुकसान पोहोचवत असतो म्हणून या गोष्टी करणे टाळले तर दातांचे आरोग्य उत्तम राहू शकते.

  •  दात घासण्यासाठी वापरण्यात येणारे टुथब्रश वेळोवेळी बदला. हे टुथब्रश दर तीन महिन्यांनी बदला. कारण टुथब्रशमध्ये बॅक्टेरिया असतात आणि यामुळे संसर्गजन्य रोग होऊ शकतात.
  • हार्ड टुथब्रश वापरणे टाळा. काही लोकांना जोरजोरात ब्रश दातांवर घासण्याची सवय असते. यामुळे दातांच्या मुळांना नुकसान पोहोचू शकते.
  • जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करणे योग्य असे अनेकांना वाटते म्हणून अनेक जण जेवल्या जेवल्या लगेच ब्रश करतात पण असे करणे चुकीचे आहे. जेवल्यानंतर नेहमी अर्ध्या तासांनतर ब्रश करा.
  • जरी टीव्हीवरच्या टुथपेस्टच्या जाहिरातीत दातांनी अक्रोड चावून दाखवणे किंवा इतर स्टंट केलेले दाखवले असले तरी अशा गोष्टी चुकूनही करू नका. दातांचा उपयोग अन्न पदार्थ चावण्यासाठी असतो, असे भलते स्टंट करण्यासाठीही नाही. म्हणूनच दातांनी बाटलीचे बूच उघडणे किंवा प्लॅस्टिकचे रॅपर उघडण्यासाठी त्याचा वापर करू नका यामुळे दातांना इजा पोहचू शकते.
  • अतिशय थंड किंवा अतिशय गरम पदार्थांमुळे दातांना इजा पोहोचू शकते. म्हणूनच थंड सरबत, कोल्ड ड्रिंक किंवा चहा घेताना काळजी घ्या.