vitamin d

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अनेक लोक घरात बसून आहे. अशात व्हिटॅमिन डीची कमतरता(vitamin d deficiency) जाणवू शकते. घरात राहून व्हिटॅमिन डीची कमतरता(home remedies for improving vitamin d) कशा प्रकारे भरुन काढता येऊ शकते, हे आपण पाहूयात.

    व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हाडं, दात आणि स्नायू मजबूत राहावे यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अनेक लोक घरात बसून आहे. अशात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवू शकते. घरात राहून व्हिटॅमिन डीची कमतरता कशा प्रकारे भरुन काढता येऊ शकते, हे आपण पाहूयात.

    • सॅल्मन फिश हे ओमेगा ३ ने समृद्ध असते. ‍ही व्हिटॅमिन डीचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. जर आपण मांसाहारी असाल आणि मासे खात असाल तर साल्मन मासे खा. याने आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल.
    • अंडे हा व्हिटॅमिन डी चं उत्तम पर्याय आहे. अंड्याच्या योक अर्थात ‍पिवळ्या भागाचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होऊ शकते.
    • संत्र्याचा रस व्हिटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढतो. आपण दररोज ऑरेंज ज्यूसचे सेवन करुन समस्या सोडवू शकतात.
    • गायीचं दूध व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. हेल्थ एक्सपर्ट्सप्रमाणे लो फॅट मिल्क ऐवजी फुल क्रीम मिल्कचे सेवन करावे ज्यात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळतं.दह्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होते. आपण याचे नियमित सेवन करु शकता.