केसांना फुटत असतील फाटे तर, करा ‘हे’ घरघुती रामबाण उपाय

बऱ्याचदा केसांना फाटे फुटल्यानंतर केस कापण्याचा अथवा ट्रीम करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण आपण स्वतः तर केस सतत कापू शकत नाही आणि पार्लरमध्ये सारखं सारखं जाणं हेदेखील परवडण्यासारखं नाही.

  केसांना फाटे फुटणं अर्थात स्प्लिट एंड्स हेअर म्हणजे केस खालून दोन भागात विभागले जातात. अर्थाही ही एक नेहमीची समस्या आहे. केसांच्या बाह्य बाजूला ही समस्या नेहमीच उद्भवत असते. यामुळे केस अगदीच कोरडे आणि वाईट होतात. यामुळे केवळ केसांची वाढच थांबत नाही तर, तुमच्या केसांचं सौंदर्यही नाहीसं होतं. बऱ्याचदा केसांना फाटे फुटल्यानंतर केस कापण्याचा अथवा ट्रीम करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण आपण स्वतः तर केस सतत कापू शकत नाही आणि पार्लरमध्ये सारखं सारखं जाणं हेदेखील परवडण्यासारखं नाही.

  त्यामुळे आम्ही तुम्हाला काही घरघुती उपाय सांगणार आहोत जे तुमच्या या समस्येवर रामबाण उपाय ठरतील.

  गरम तेलाने मालिश 

  केसांना पोषण देण्यासाठी आणि मुलायम ठेवण्यासाठी गरम तेलाच्या मालिशव्यतिरिक्त दुसरा चांगला पर्याय नाही. यामुळे केवळ तुमचे केसांचे फाटे फुटण्यापासून सुटका मिळत नाही तर तुमच्या केसांचा मुलायमपणादेखील राखला जातो. यामुळे तुमचे केस अधिक चमकदर, स्वस्थ आणि सुंदर होतात. केसांवर करण्यात आलेल्या मालिशमुळे डोक्यातील रक्तप्रवाहदेखील चांगला राहतो. त्यामुळे केसांचा लवकर विकास होतो आणि केस वाढतात. नियमित स्वरुपात घरामध्ये तेल गरम करून व्यवस्थित मालिश करा आणि त्यानंतर तुमचे केस गरम टॉवेलमध्ये बांधून थोडा वेळ तसेच राहू द्या. थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर केस शँपूने धुवा.

  अंड्याचं मास्क 

  केसांसाठी अंडं हे अतिशय आवश्यक असून फॅटी अॅसिड आणि प्रोटीनचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. यामुळे केवळ केसांना पोषणच मिळत नाही तर केसांना मजबूती मिळते आणि केसांना फाटे फुटण्याच्या समस्येपासून अंडे संरक्षण करते. अंड्याचा मास्क बनविण्यासाठी एक अंड (बलकासह), एक चमचा दही, त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्या आणि मिक्स करून तुमच्या केसांना साधारण 45 मिनिट्स लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. असं आठवड्यातून एकदा नक्की करा. तुम्हाला स्वतःला केसांमधला चांगला फरक जाणवेल.3. एकच केळं फायदेशीर

  केळं हे खाण्यासाठी पौष्टिक असतं हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केळं फायदेशीर असतं हे खूप कमी लोकांना माहीत आहे. एक केळं मिक्सरमधून नीट वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडं एरंडाचं तेल मिक्स करा. तसंच त्यामध्ये 2 मोठे चमचे दूध आणि थोडा मध घालून मिक्स करून घ्या. हा मास्क आठवड्यातून एकदा साधारण अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. अतिशय वाईट दिसणाऱ्या आणि फाटे फुटलेल्या केसांवर हा अगदी रामबाण उपाय आहे.

  मध आणि दह्याचं मिश्रण

  केसांना मुलायमपण आणण्यासाठी आणि केसांचं फाटे फुटणं कमी करण्यासाठी मध आणि दह्याचं मिश्रण केसांना लावावं. हे कॉम्बिनेशन तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावल्यानंतर तुमच्या केसांमधील बदल तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. मध तुमच्या केसांना मुलायमपणा देतो तर दही केसांना मजबूती देत त्यामध्ये चमकदारपणा आणतं.

  पपायाचं पॅक

  पपाया पोट स्वस्थ ठेवण्यास मदत करते हे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, पपाया हे हेअर हॅक म्हणूनदेखील चांगलं काम करतं. प्रोटीन आणि अमिनो अॅसिडचं प्रमाण पपायामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे, मुळापासून केस चांगलं राखण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला पपई नीट वाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दही घेऊन नीट मिक्स करा. हे पॅक तुम्ही साधारण 45 मिनिट्स लावा. त्यानंतर केसांना नीट शँपूने धुवा. आठवड्यातून तुम्ही एकवेळ असं केल्यास, लवकरच तुम्हाला केसांच्या फाटे फुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

   मेथीमुळे केसांचं सौंदर्य वाढतं 

  मेथीमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे केसांची वाढ जलद होते. मेथी केसगळती, केसांना काळं करण्यासाठी, कोंडा घालवण्यासाठी तसंच केसांचे फाटे कमी करण्यासाठी लाभदायक आहे. तसंच केसांना घनदाट आणि मजबूत करण्यासाठीदेखील मेथीचा उपयोग होतो. त्यासाठी तुम्हाला चार मोठे चमचे दह्यामध्ये मेथीचे दाणे अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर हे मिश्रण केसांना साधारण अर्धा तास लावून ठेवा. नंतर शँपूने केस धुवा. यामुळे केवळ केसाला फाटे फुटण्याची समस्येपासूनच सुटका होईल असं नाही तर, तुमच्या केसांचा कोरडेपणा दूर होऊन तुमचे केस मुलायम होतील.

  कोरफड अर्थात ॲलोव्हेरा 

  घरगुती उपायांबद्दल आपण बोलत आहोत आणि कोरफडचं नाव त्यामध्ये नसावं असं होणं शक्यच नाही. कोरफडमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण कमी होतं. त्यासाठी तुम्हाला कोरफड जेलमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे एरंडेल तेल मिसळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण घेऊन केसांना मसाज करा. मसाजनंततर साधारण अर्धा तास हे मिश्रण केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर केस शँपूने धुवून टाका.