लॉकडाऊनमध्येही सुरु आहे ऑफिस वारी, मग ‘या’ गोष्टींची नक्की घ्या काळजी

आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेकजण ऑफिसमध्ये जात आहेत. तुम्हीसुद्धा लॉकडाऊनमध्ये ऑफिसला जात असाल तर काही गोष्टींची खबरदारी (instruction to follow while going to office)घेणे आवश्यक आहे.

  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिणामी भारतातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनची(lockdown) घोषणा करण्यात आली आहे.मात्र काही जणांना लॉकडाऊनमध्येही ऑफिसमध्ये जावे लागत आहे. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेकजण ऑफिसमध्ये जात आहेत. तुम्हीसुद्धा लॉकडाऊनमध्ये ऑफिसला जात असाल तर काही गोष्टींची खबरदारी (instruction to follow while going to office)घेणे आवश्यक आहे.

  • जर तुमचे ऑफिसला जाणे खूप आवश्यक असेल तर शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळा. सार्वजनिक वाहतूक सोडून इतर पर्यायांचा वापर करा.यामुळे तुम्ही कमी लोकांच्या संपर्कात याल.
  • मास्क,ग्लोव्हज आणि सोशल डिस्टन्सिंग याचा कधीही विसर पडू देऊ नका. नेहमी तुमच्यासोबत सॅनिटायझर ठेवा. कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर त्याचे हात मास्कला लावू नका.
  • ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांपासून अंतर राखा. कुणाशीही बोलताना लांबून बोला. मास्क न काढताच सगळ्यांशी संभाषण करा. कुणासोबतही हस्तांदोलन करु नका.
  • आपले जेवण शक्यतो शेअर करायला जाऊ नका. बाहेरून खाण्याचे पदार्थ मागवू नका. खूप लोकांसोबत जेवण्याऐवजी एकटे जेवा.
  • तुम्ही स्वत:च्या वाहनाने ऑफिसला जात असाल तर तुमचे वाहन सकाळी ऑफिसला जायच्या आधी आणि ऑफिसमधून घरी आल्यावर सॅनिटाईझ करा. गाडीत इतर कुणी बसत असल्यास सॅनिटाईझ केल्याने थोडा धोका कमी होतो.